कऱ्हाडजवळ व्यायामाला गेलेल्या तिघांना कंटेनरने चिरडले

अमोल जाधव 
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पहाटे व्यायामास गेलेल्या तिघांना भरधाव आलेल्या कंटेनरने चिरडले. त्यात तिघेही जागीच ठार झाले.

रेठरे बुद्रूक (ता. कऱ्हाड) : पहाटे व्यायामास गेलेल्या तिघांना भरधाव आलेल्या कंटेनरने चिरडले. त्यात तिघेही जागीच ठार झाले. कऱ्हाड ते तासगाव रस्त्यावर शेणोली येथील पोल्ट्रीजवळ पहाटे ही घटना घडली.

यामध्ये दीप ज्ञानू गायकवाड (वय 45), प्रवीण हिंदुराव गायकवाड (40) व विशाल धोंडिराम गायकवाड (30, तिघे रा. सम्राटनगर, शेणोली, ता. कऱ्हाड) अशी मृतांची नावे आहेत. चौघेजण व्यायामाला गेले होते. त्यातील तिघांना भरधाव निघालेल्या कंटेनरने चिरडले. त्यात तिघेही ठार झाले.

शेणोलीतील साबळे वाडीपासून शेणोलीच्या बाजूला एक हजार फुटावर रस्त्यात ही घटना घडली. या चाैघांमधील बाजूला व्यायाम करणारा रोहित आनंदराव गायकवाड सुदैवाने बचावला आहे. पहाटे काही कळायच्या आत दुर्घटना घडली. शेजारीच वस्ती असल्याने बचाव कार्य त्वरीत करण्यात आले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळावर गर्दी झाली होती. पोलिसही पोचले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed in accident in satara