ट्रकला जोरदार धडक दिल्याने बुलेरो जीपचा भीषण अपघात; तीन जागीच ठार

satara
satara

खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील जुन्या टोलनाका जवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या बुलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये बलेरो जीपचे मोठे नुकसान झाले. या घटनेबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग)वरुन मुबंईला जात असताना भरधाव वेगात जाणारी बलेरो जीपने ( गाडीक्रमांक (एम-एच 47-एबी 1784) पुढे चालणाऱ्या ट्रकला (गाडीक्रमांक केएल 16 यु - 4420) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तीन जण जागेवरच मयत झाले तर चालकासह दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना खंडाळा येथील खाजगी मानसी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मृतामध्ये पति हे मयत झाले असुन, पत्नि ही गंभीर जखमी झाली आहे. माञ अपघातग्रस्त गाडी मध्ये जखमी हे बेशुध्द असल्याने नातेवाईकांना बोलावुन पुढील माहिती घेण्याचे काम खंडाळा पोलिस करीत आहे.

या अपघातातील  विलास सामंत मेहुणा(रा .पाट ता .कुडाळ सिंधुदुर्ग), बाळकृष्ण सामंत ( रा. दहिसर मुंबई), विनायक कामत (पति) (रा.तळवडे ता.सावंतवाडी) हे जागेवरच मयत झाले तर, पत्नी स्मिती कामत  (रा . तळवडे ता .सावंतवाडी) व चालक रवि गावकर(रा.जुहुसर्कल मुंबई ) हे गंभीर जखमींची नावे आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com