कोल्हापूरः हेमंत पाटीलह तिघांना तीन महिन्याची शिक्षा 

कोल्हापूरः हेमंत पाटीलह तिघांना तीन महिन्याची शिक्षा 

कोल्हापूर - संस्थेच्या हॉलचे बांधकामाच्या कारणावरून तत्कालिन अध्यक्षांकडून जबरदस्तीने 15 लाखांच्या धनादेशावर स्वाक्षरी घेतल्या प्रकरणी न्यायालयाने हेमंत ऊर्फ बापूसाहेब पाटीलसह तिघांना दोषी ठरवले. त्या तिघांना तीन महिन्याच्या शिक्षेसह प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. संभाजी त्र्यंबक पाटील व अशोक अनंत रेगे (रा. अंबाई डिफेन्स पर्सनिल को-ऑप हौसिंगोसायटी, सागरमाळ) अशी अन्य दोघा संशयितांची नांवे आहे. फिर्यादीतर्फे ऍड. शिवाजीराव राणे यांनी काम पाहीले. 

सागरमाळ येथे अंबाई डिफेन्स पर्सोनेल को-ऑप हौसिंग सोसायटी आहे. या संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष वसंतराव रामचंद्र देसाई हे निवृत्त सैनिक आहेत. त्यांनी संस्थेच्या सांस्कृतिक हॉलचे काम कॉन्ट्रॅक्‍टर विजय देसाई यांना दिले होते. 12 सप्टेबर 2010 रोजी दुपारी संस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यात हेमंत ऊर्फ बापूसाहेब रंगराव पाटील (कुर्लीकर), संभाजी त्र्यंबक पाटील, अशोक अनंत रेगे आणि संग्रामसिंह आनंदराव घाटगे या चौघांनी संगणमत करून कॉन्ट्रॅक्‍टरने हॉलचे काम निष्कृष्ठ दर्जाचे केलेल्याचा खोटा कांगावा केला.

याबद्दल्यात तत्कालिन अध्यक्ष वसंतराव देसाई यांनी 15 लाख रूपये द्यावेत अशी बैठकीत जोरदार ओरडा केला. त्यानंतर देसाई यांना घरातून धनादेश बुक आणण्यास जबदरस्ती केली. त्यानंतर 15 लाखांचा धनादेश लिहून त्यावर त्यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. याबाबत वसंतराव देसाई यांनी राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.

या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. एस. गुंजवटे यांच्या न्यायालयात झाली. ही सुनावणी सुरू असताना संशयित संग्रामसिंह घाटगे यांचा मृत्यू झाला. फिर्यादी तर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राणे यांनी आठ साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूचा युक्तीवादानंतर न्यायाधिश गुंजवटे यांनी हेमंत ऊर्फ बापूसाहेब पाटील, संभाजी पाटील व अशोक रेगे या तिघांना दोषी ठरवले.त्यांना तीन महिन्याची शिक्षा आणि प्रत्येकी तीन हजाराचा दंड ठोठावला. तो न दिल्यास 15 दिवसाची साधी कैदची शिक्षा सुनावली असल्याचे ऍड. राणे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com