खंडणीसीठी मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सातारा : पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी येथील एका मुख्याध्यापकास
शासकीय विश्रामगृहातील खोलीत कोंडून मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या सुनिल काळेकरसह तिघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे व भाजपच्या युवा आघाडीचा संदीप मेळाट अशी अन्य संशयीतांची नावे आहेत. याबाबत मुख्याध्यापक अमोल एकनाथ कोळेकर (रा. शाहुपूरी) यांनी चौघांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरील संशयीतांनी 16 मे रोजी कोळेकर यांना विश्रामगृहातील 9 क्रमाकांच्या
खोलीमध्ये बोलावून घेतले. या वेळी एका महिलेचा विनयभंग केल्याचे कबूल
करण्यासाठी त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे कोळेकर यांनी कबूली दिल्यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये मागण्यात आले. त्याला असमर्थता दर्शविल्यावर कोळेकरांना पुन्हा मारहाण करण्यात आली होती.

याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व संशयीत पसार झाले होते. त्यांनी
अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्जही न्यायालयाने
फेटाळला. त्यानंतरही ते पोलिसांना सापडत नव्हते. आज दुपारी शहर पोलिसांनी त्यांना अटक केली.

Web Title: Three people arrested for asking money