नगरमध्ये भिंत कोसळून तिघे जण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

नगर : शहरातील सत्ता कॉलनी येथे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून तीन मजूर त्याखाली गाडले गेले. तिघांचा जागीच मृत्यू झाला. रोहन विजय फुलारे (वय 22 रा बुरुडगाव ता.नगर) गोविंद शंकर शिंदे (वय 32 बुरुडगाव ता. नगर) राहुल विजय फुलारे (वय 26 रा. बुरुडगाव ता. नगर) असे मृतांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, नगर बाजार समितीच्या बाजूला असलेल्या सथ्था कॉलनीमध्ये एका इमारतीचे काम सुरू होते. वरील तिघे मजूर इमारतीची स्टाईल फरशी काढण्याचे काम करीत होते. ज्या भिंतीची स्टाईल फरशी काढण्याचे काम सुरू होते. त्या भिंतीला लागूनच दुसऱ्या बाजूने कंपाउंडची भिंत होती. सायंकाळी पाच वाजता फरशी काढण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत कोसळून त्याखाली वरील तिघे गाडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Three people killed due to wall collapsed in Nagar