सोलापुरातील तिघांची लागणार मंत्रिमंडळात वर्णी?

सोलापुरातील तिघांची लागणार मंत्रिमंडळात वर्णी?

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्याप शिवसेना-भाजप युतीच्या सरकारचे घोडे मंत्रिमंडळावरुन जागेवरुन पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. मात्र, युती सरकारमध्ये सोलापुरातील दोघांना कॅबिनेट तर एकाला राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये विजयकुमार देशमुख, तानाजी सावंत आणि संजय शिंदे अथवा राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. 

सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी परजिल्ह्यातील भूम-परांड्याची जागा मिळविली. राजकारणात अशक्‍य काहीच नसते, हे त्यांनी दुसऱ्यांदा दाखवून दिले. तत्पूर्वी, त्यांना काही महिन्यांकरिता राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यांनी चमकदार कामगिरी केल्याने शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यात तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा असून, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 73 हजारांचे मताधिक्‍य घेत विजयकुमार देशमुख यांनी विजयाला गवसणी घातली. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांचा दारुण पराभव केला.

मागील मंत्रिमंडळात विजयकुमार देशमुख यांना राज्यमंत्रिपद मिळाले. मात्र, आता लिंगायत आमदार म्हणून त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटपद मिळेल, अशी चर्चा आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविलेले संजय शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अपक्ष उमेदवारी भरली.

अटीतटीच्या लढाईत शिवसेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल अन्‌ अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांना मागे टाकत संजय शिंदे यांनी विजय मिळवला. दुसरीकडे राज्यात युती असतानाही माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी मंत्री दिलीप सोपल यांचा पराभव केला. त्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे राऊत अथवा शिंदे यांच्यातून एकाला राज्यमंत्रिपद मिळेल, अशीही चर्चा आहे.

सुभाष देशमुख यांची मोर्चेबांधणी

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांची मतदारसंघावरील पकड सैल झाल्याचा अनुभव विधानसभा निवडणुकीत आला. नगरसेवक
बाबा मिस्त्री यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली अन्‌ त्यांनी मोठी मते मिळवली. त्यांनी आव्हान उभे केल्याने सुभाष देशमुख यांना 23 हजारांचे मताधिक्‍य मिळाले.

दरम्यान, विजयानंतर त्यांनी आता राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळावी. यादृष्टीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी
यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेना-भाजप युती सरकारचे मंत्रिपदावरुन अडलेले घोडे कशाप्रकारे पुढे सरकते, यावर पुढील समीकरणे अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com