तीन विषारी नागांना जीवदान! 

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

तळेगाव दिघे (अहमदनगर): कऱ्हे (ता.संगमनेर) शिवारातील एका विहिरीतून सर्पमित्र सचिन गिरी यांनी यांनी तीन विषारी नागांना सुरक्षित बाहेर काढत जीवदान दिले. 

कऱ्हे शिवारातील राजाराम ज्ञानदेव सानप यांच्या विहिरीत तब्बल तीन विषारी नाग आढळून आले. सर्पमित्र सचिन गिरी यांनी दोर, बादली व अन्य साहित्य वापरून अडीचतास परिश्रम घेत तीनही नागांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे राजाराम सानप यांनी सुटकेचा निश्वास टाकला. नागांना बाहेर काढण्यासाठी अमित पुरी, निखील चौधरी, गणेश सानप व ग्रामस्थांची मदत केली.

वनविभागाची अशावेळी मदत मिळत नसल्याची खंत सरपंच बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केली. कोणत्याही वन्य प्राण्यांपासून कुणाला ईजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा वेळी त्यापासून माणसांचा वा अन्य प्राण्याचा जीव वाचविण्यासस प्राधान्य द्यावे, असे आवाहन सर्पमित्र सचिन गिरी यांनी केले.

Web Title: Three poisonous snakes alive!