साताऱ्यामधील तीन रस्ते वाहतुकीसाठी बंद

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 7 मे 2018

सातारा पालिकेद्वारे शुक्रवार पेठेतील कोटेश्‍वर चौक ते गेंडामाळ नाका (शाहूपुरी) रस्त्यावर कोटेश्‍वर चौकात तसेच अर्कशाळा आणि सदरबझार येथील अमेरिकन चर्च चौक ते श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान रस्त्यावर उद्यानालगत अशा तीन ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत.

सातारा - शहरातील तीन ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलांचे काम युद्धपातळीवर व्हावे, यासाठी कोटेश्‍वर मंदिर ते अर्कशाळा रस्ता, तसेच अमेरिकन चर्च (सदरबझार) चौक ते श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान रस्ता हे आजपासून (सोमवार) वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

या परिसरातील वाहतूक वळविण्यात आली असून, पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे. सातारा पालिकेद्वारे शुक्रवार पेठेतील कोटेश्‍वर चौक ते गेंडामाळ नाका (शाहूपुरी) रस्त्यावर कोटेश्‍वर चौकात तसेच अर्कशाळा आणि सदरबझार येथील अमेरिकन चर्च चौक ते श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान रस्त्यावर उद्यानालगत अशा तीन ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. या तिन्ही पुलांच्या कामांचे भूमिपूजन नुकतेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. या पुलांची कामे तत्काळ पूर्ण व्हावीत, यासाठी या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन पालिकेद्वारे करण्यात आले आहे.

आगामी सहा महिन्यांसाठी या परिसरातील वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पालिकेद्वारे करण्यात आले आहे.

Web Title: Three roads are closed in satara