मिरजेत तीन ठिकाणी सशस्त्र दरोडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मिरज - मिरजेत तीन घरांवर सशस्त्र दरोडे टाकत एकास बेदम मारहाण करण्यात आली आहे. यावेळी दरोडेखोरांनी २९ हजारांच्या रोकडसह १८ तोळे सोन्याचे दागिने असा पाऊणे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. १५ ते २० जणांच्या टोळीने हे दरोडे घातले आहेत. यामुळे मिरजेत खळबळ उडाली आहे. 

जुने सावळी - मालगाव रोड आणि मिरज पंढरपूर मार्गावर आज पहाटेच्या सुमारास हे दरोडे टाकण्यात आले आहेत. सुमारे १५ ते २० जणांच्या टोळीने तोंडाला रुमाल बांधून घरांचे दरवाजे दगड घालून फोडले. या दरोडेखोरांनी प्रथम मिरज पंढरपूर रोडवरील प्रफुल कुमार घेटिया यांच्या फॉर्म हाऊस वरील कामगार रमेश सूर्यवंशी यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी दरवाजा उघडत नसल्याने दरोडेखोरांनी मोठा दगड घालून दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. तलवारीचा धाक दाखवून पैसे व सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर दरोडेखोरांनी जुने सावळी -मालगाव रोडवरील चव्हाण मळ्याकडे मोर्चा वळवत याठिकाणी राहात असलेल्या विजय चव्हाण, नंदकुमार चव्हाण यांच्या घराचे दरवाजे दगड घालून तोडले. येथेही तलवार, कोयत्याची धाक दाखवला. विजय चव्हाण यांना बेदम मारहाण केली. घरातील लोखंडी कपाट कटावणीने तोडून कपाटातील १५ तोळे सोन्याचे दागिने, रोख २५ हजार रुपये चोरून नेले. या घटनेमुळे मिरज तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: three robbery incidence in Miraj