पाणीपुरवठ्याचे तीन तेरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

कोल्हापूर - शिंगणापूर योजनेच्या पुईखडी ते शिंगणापूर मार्गावर फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते न होते तोच याच मार्गावर आणखी एका ठिकाणी जलवाहिनी फुटली. त्यामुळे आज निम्म्याहून अधिक शहराला पाणीपुरवठा झाला नाही. नगरसेवकांनी भागातील नागरिकांना पाणी पुरवण्यासाठीच्या टॅंकरची पळवापळवी केली. त्यामुळे बावडा फिल्टर हाउस आणि कळंबा फिल्टर हाउस येथे टॅंकरवरून वाद झाले. नगरसेवकांच्या वादात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी झाली. विशेषतः ए, बी आणि ई वॉर्डांतील निम्मा भाग पाण्यापासून वंचितच राहिला. सलग दुसऱ्या दिवशी पाणी न आल्याने नागरिकांची पाण्यासाठी धावपळ झाली. उद्याही (ता.

कोल्हापूर - शिंगणापूर योजनेच्या पुईखडी ते शिंगणापूर मार्गावर फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते न होते तोच याच मार्गावर आणखी एका ठिकाणी जलवाहिनी फुटली. त्यामुळे आज निम्म्याहून अधिक शहराला पाणीपुरवठा झाला नाही. नगरसेवकांनी भागातील नागरिकांना पाणी पुरवण्यासाठीच्या टॅंकरची पळवापळवी केली. त्यामुळे बावडा फिल्टर हाउस आणि कळंबा फिल्टर हाउस येथे टॅंकरवरून वाद झाले. नगरसेवकांच्या वादात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी झाली. विशेषतः ए, बी आणि ई वॉर्डांतील निम्मा भाग पाण्यापासून वंचितच राहिला. सलग दुसऱ्या दिवशी पाणी न आल्याने नागरिकांची पाण्यासाठी धावपळ झाली. उद्याही (ता. 18) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू आहे. उद्यापर्यंत हे काम पूर्ण होईल.
 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर योजनेच्या जलवाहिनीला मंगळवारी दुपारी एका ठिकाणी गळती लागली. प्रशासनाने ही गळती काढण्याचे काम हाती घेतले, पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले. तोच याच मार्गावरील आणखी एका ठिकाणी मुख्य जलवाहिनी रात्री अकराच्या सुमारास फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला. शहरातील ए, बी आणि ई वॉर्डातील निम्म्याहून अधिक भागाचा पाणीपुरवठा आज बंद झाला. ऐन सणासुदीच्या काळात हा पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव झाली. महापालिकेने आठ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला. दिवसभरात साठहून अधिक खेपा करण्यात आल्या; पण मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी असल्याने पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव झाली. दरम्यान जलवाहिनी दुरुस्तीचे कामही सुरू असून उद्या सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता जलअभियंता मनीष पवार यांनी व्यक्त केली आहे.

फेऱ्या वाढवल्या
महापालिकेकडील टॅंकर 8
वर्दीच्या ठिकाणी टॅंकरमध्ये पाणी पोचविणे आणि टॅंकर रिकामा होईपर्यंत थांबणे असे एका टॅंकरला एक खेपेसाठीचा वेळ ः अडीच ते तीन तास
एका टॅंकरच्या दिवसभरात फेऱ्या ः 3
कळंबा फिल्टर हाउस व कसबा बावडा फिल्टर हाउसमधून खेपा ः 60 हून अधिक
मागणी वाढल्याने फेऱ्या वाढवल्या

Web Title: Three thirteen water