शहरात एकाच दिवशी तीन हजार टेस्ट! 'या' नगरांमध्ये सापडले 144 पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Monday, 27 July 2020

ठळक बाबी... 

 • शहरात रविवारी झाली सर्वाधिक तीन हजार 47 व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट 
 • नव्याने सापडले 144 कोरोना पॉझिटिव्ह; सिध्देश्‍वर पेठ, रेल्वे लाईन व मेरगू टॉवर, सूत मिलजवळील प्रत्येकी एकाचा मृत्यू 
 • शहरातील एकूण 30 हजार 47 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट; त्यापैकी चार हजार 707 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा 
 • आज तिघांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या 348 झाली 
 • प्रभाग क्रमांक तीन, चार, 14, 24 आणि 26 या प्रभागातील रुग्णसंख्या दोनशेंहून अधिक 
 • एकूण रुग्णांपैकी दोन हजार 839 रुग्णांची कोरोनावर मात; दीड हजार रुग्णांवर उपचार सुरु 

सोलापूर : आतापर्यंत शहरातील 30 हजारांहून अधिक व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये चार हजार 707 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी (ता. 26) सर्वाधिक तीन हजार 47 व्यक्‍तींची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 144 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सिध्देश्‍वर पेठेतील 72 वर्षीय पुरुष, रेल्वे लाईन परिसरातील 82 वर्षीय तर मेरगू टॉवरजवळील सूत मिल परिसरातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

वर्धमान नगर, रत्नमंजिरी सोसायटी, शिवगंगा नगर, सुभाष नगर, मंगल विहार अर्पाटमेंट (जुळे सोलापूर), भवानी पेठ, महापालिका कॉलनी (सात रस्ता), मोदी खाना, लोधी गल्ली, लक्ष्मी मंदिराजवळ, मजरेवाडी (मजरेवाडी), संतोष नगर, शिवाजी नगर (बाळे), काडादी चाळ, मेरगू टॉवर, पापराम नगर, संजय गांधी नगर (विजयपूर रोड), थोबडे वस्ती (जुना देगाव नाका), विडी घरकूल (हैदराबाद रोड), शिवगंगा नगर (पारशी विहिरीमागे), मुरारजी पेठ, एन.जी. मिल चाळ, कुमठे तांडा, लक्ष्मी नगर (हत्तुरे नगर), सत्तर फूट रोड, रेवणसिध्देश्‍वर नगर, बुधवार पेठ, वसंत विहार व राधाकृष्ण कॉलनी, गवळी वस्ती (दमाणी नगर), कमल शेरी अपार्टमेंट (बुधवार पेठ), नागनाथ सोसायटी (एमआयडीसी), ऋषि नगर, थोबडे वस्ती (लक्ष्मी पेठ), इंदिरा झोपडपट्टी, सिध्देश्‍वर पेठ, नंदीकेश नगर (शेळगी), दत्त मंदिराजवळ (देगाव), पश्‍चिम मंगळवार पेठ, दक्षिण सदर बझार, हुच्चेश्‍वर नगर, तिरुपती कॉर्नर (मोदी), शोभा नगर, मंजुषा हौसिंग सोसायटी, राजस्व नगर, इंद्रधनु सोसायटी, अमृता नगर, इंदिरा नगर, विष्णू नगर (नई जिंदगी), लतादेवी नगर (कुमठा नाका), राम शेट्टी नगर, स्टेट बॅंक कॉलनी, विद्या नगर, शिंदे चौक, न्यू पाच्छा पेठ, बागवान नगर, राघवेंद्र नगर, केकडे नगर, कोटा नगर (जुना विडी घरकूल), माशाळ वस्ती (जुना पुना नाका), योगीराज महादेवी नगर, हरळय्या नगर (होटगी रोड), मड्डी वस्ती (कुमठे), शंकर नगर, आसरा हौसिंग सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), रोहिदास नगर, अवंती नगर, थोबडे नगर, निलकंठेश्‍वर मंदिराजवळ याठिकाणी रविवारी (ता. 26) नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचा अहवाल महापालिकेने आज (सोमवारी) दिला.  

ठळक बाबी... 

 • शहरात रविवारी झाली सर्वाधिक तीन हजार 47 व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट 
 • नव्याने सापडले 144 कोरोना पॉझिटिव्ह; सिध्देश्‍वर पेठ, रेल्वे लाईन व मेरगू टॉवर, सूत मिलजवळील प्रत्येकी एकाचा मृत्यू 
 • शहरातील एकूण 30 हजार 47 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट; त्यापैकी चार हजार 707 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा 
 • आज तिघांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या 348 झाली 
 • प्रभाग क्रमांक तीन, चार, 14, 24 आणि 26 या प्रभागातील रुग्णसंख्या दोनशेंहून अधिक 
 • एकूण रुग्णांपैकी दोन हजार 839 रुग्णांची कोरोनावर मात; दीड हजार रुग्णांवर उपचार सुरु 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand tests in a single day in the solapur city 144 positive Death of three