ट्रॅक्‍टर पलटी झाल्यामुळे तीन महिला जागीच ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

टेंभुर्णी - सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या बादलेवाडी ते शेडशिंगे दरम्यान कॅनॉलपट्टीने मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्‍टर पुलावरून वळण घेत ट्रॉलीसह कॅनॉलमध्ये पलटी झाल्याने तीन महिला जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये मायलेकींचा समावेश आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातातील गंभीर जखमींना सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. 

या अपघातामध्ये केराबाई सर्जेराव कोयले (वय 50) , शांताबाई सोमनाथ कोयले (वय 60) व त्यांच्या कन्या छाया गजेंद्र गोफणे (वय 34, तिघीही रा. शेडशिंगे, ता. माढा, जि.सोलापूर) या ठार झाल्या आहेत. सर्जेराव वसुदेव कोयले (वय 65), रतन बिरूदेव कोयले (वय 35), छाया भालचंद्र कोयले (वय 40), हरिदास भालचंद्र कोयले (वय 19, रा. सर्वजण शेडशिंगे ता. माढा, जि. सोलापूर) हे सर्वजण या जखमी झाले. 

कोयले कुटुंबिय शेतातील कामे उरकून रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्‍टर व ट्रॉलीमध्ये बसून कॅनॉलपट्टीने शेडशिंगेला जात होते. कॅनॉलवरील छोट्या पुलावरून वळण घेत असताना ट्रॅक्‍टर पलटी झाल्याने तो ट्रॉलीसह सुमारे पंचेवीस फुट खोल असलेल्या कॅनॉलमध्ये पडला. त्यामुळे ट्रॅक्‍टरमधील तीन महिला जागीच ठार  झाल्या तर चौघेजण गंभीर जखमी झाले.

Web Title: Three women killed on the spot due to a tractor flip hit