...तर एसटीचा प्रवास प्रचंड महागेल : रावते

तात्या लांडगे
गुरुवार, 31 मे 2018

सोलापूर - दिवसेंदिवस वाढत असलेल्या डिझेलच्या किमतीमुळे एसटी महामंडळाला सुमारे 470 कोटींचा फटका सहन करावा लागत आहे. अगोदरच एसटी महामंडळाला सुमारे 2 हजार 300 कोटी रुपयांचा तोटा आहे. राज्य सरकारने इंधनावरील करमाफ न केल्यास एसटीचा प्रवास प्रचंड महागेल, असा इशारा राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 'सकाळ'शी बोलताना दिला. 

इंधनदरवाढीमुळे अगोदरच अडचणीत सापडलेले राज्य परिवहन खाते पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली एसटी सेवा सुरळीत चालू राहावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इंधनावरील राज्य सरकारचे सर्व कर एसटी महामंडळासाठी माफ करावेत, अशी मागणी केली आहे. त्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत सकारात्मक चर्चाही झाली आहे. परंतु, अद्यापही त्याबाबत निर्णय झालेला नाही. राज्य सरकारने पुढाकार घेवून एसटी महामंडळासाठी इंधनावरील कर माफ न केल्यास एसटी प्रवास प्रचंड महागेल. हा महागडा प्रवास सर्वसामान्यांना परवडणार नाही, त्यामुळे सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे श्री. रावते यांनी सांगितले. 

संपाचा कर्मचाऱ्यांना अधिकार 
आपल्या न्याय व हक्‍कासाठी आंदोलन, संप करण्याचा अधिकार हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा आहे. सध्या इंधनदरवाढीसह अन्य कारणांमुळे राज्य परिवहन अडचणी असून, कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परंतु, संप करण्याचा अधिकार जरी कर्मचाऱ्यांचा असला तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाचा आहे. 
दिवाकर रावते, राज्य परिहवन मंत्री

Web Title: The ticket of ST will increased