ज्वारी, बाजरीची भाकरी महागणार.... कारण....

राजाराम माने
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- परतीच्या पावसाचा फटका

- उत्पादनात घट 

- ज्वारी पीक अति पावसामुळे पिवळे पडून सडून गेले

- लांबलेल्या पावसामुळे ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

केत्तूर (सोलापूर) : यावर्षी परतीच्या पावसाचा फटका ज्वारी, बाजरी यासह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. त्यामुळे त्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. बाजारात सध्या भाजीपाल्याचे दर वाढले असतानाच ज्वारी, बाजरीचे दरही वाढत असल्याने गरिबांच्या ज्वारी, बाजरीच्या भाकरीला यापुढे महागाईचे चटके बसणार, असे संकेत मात्र मिळत आहेत. 

राज्यातील 112 साखर कारखान्यांना गाळपासाठी परवानगी

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, राजस्थान येथेही बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. तेथेही परतीच्या पावसामुळे बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात बाजरी प्रतिक्विंटल 200 ते 400 रुपयांनी महाग झाली आहे. मानवी शरीरास बाजरी पोषक मानली जात असल्याने बाजरीला मागणी वाढली आहे. परंतु, त्याची आवक कमी होत असल्याने वरचेवर त्याचे दर वाढत आहेत. 

माजी मंत्र्यांच्या मुलीचा छळ...! कारण...

दसऱ्याच्या सुमारास हायब्रीड व इतर जातीच्या ज्वारीची आवक सुरू होते. मात्र, लांबलेल्या पावसामुळे ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्वारी पीक अति पावसामुळे पिवळे पडून सडून गेले. यापुढे येणारे पीक येण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे सध्या ज्वारीचे दरही तीन हजार 800 ते चार हजार 100 पर्यंत वाढले आहेत. गावरान ज्वारीची आवक सोलापूर, नगरवरून होते, ती सध्या अत्यंत अल्प आहे. मालाची आवक कमी होत असल्याने व मागणी जास्त असल्याने यापुढे आगामी काळातही ज्वारी, बाजरीचे दर आणखी वाढतील, अशी माहिती करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी "सकाळ'ला सांगितले. 

आवक घटली, दर वाढले
पावसाळा लांबल्याने ज्वारी, बाजरीच्या उत्पादनाला चांगलाच फटका बसला आहे. परिणामी दर्जाही खालावला आहे, आवकही घटली आहे. त्यामुळे दर वाढू लागले आहेत. 
- पप्पू उकिरडे, मार्केट कमिटी कर्मचारी, करमाळा 

सध्याचे दर 
बाजरी - 2200 ते 2400 
गावरान ज्वारी - 3800 ते 4100 
हायब्रीड ज्वारी - 2600 ते 3000 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tide, millet bread will be expensive .... because ....