जिल्ह्यातील 520 संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ...पाच महिने मांधनापासून वंचित 

शिवाजीराव चौगुले
Sunday, 13 September 2020

शिराळा (सांगली)-  ग्रामपंचायत विभागात काम करणाऱ्या जिल्ह्यातील 570 ग्रामपंचायत मधील 520 संगणक परिचालक यांना गेले पाच महिने मानधन मिळाले नाही. त्यामुळे कामाचे दाम नाही, दुसरीकडे काम नाही, मग आम्ही कुटुंब जगवायचे कसे या विवंचनेत संगणक परिचालक सापडले आहेत. 

शिराळा (सांगली)-  ग्रामपंचायत विभागात काम करणाऱ्या जिल्ह्यातील 570 ग्रामपंचायत मधील 520 संगणक परिचालक यांना गेले पाच महिने मानधन मिळाले नाही. त्यामुळे कामाचे दाम नाही, दुसरीकडे काम नाही, मग आम्ही कुटुंब जगवायचे कसे या विवंचनेत संगणक परिचालक सापडले आहेत. 

कोरोना काळात आपला जीव धोक्‍यात घालून संगणक परिचालक गाव पातळीवर काम करत आहेत. बाहेर येणाऱ्या लोकांच्या नोंदी ठेवणे, विविध कोरोना रिपोर्ट, चेकपोस्टड्युटी हे काम कोरोना योद्धा म्हणून करत आहेत. मानधन मिळाले नसल्याने गेल्या 10 ऑगस्ट पासून सांगली जिल्हा सर्व संगणक परिचालक एक महिन्या पासूनबेमुदत संपावर पुकारला असला तरी ते कोरोनाचे काम करत आहेत. गेली 10 वर्ष ग्रामपंचायत स्थरावर विविध दाखले उतारे, विविध रिपोर्टिंगचे कामे हा संगणक परिचालक करत आला आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या 570 ग्रामपंचायत मध्ये 520 संगणक परिचालक कार्यरत आहेत. त्यांचे मानधन हे शासनाच्या 14 व 15 व्या वित्त आयोग निधीमधून होते. ही रक्कम शासनाकडून ग्रामपंचतीकडे येते. ग्रामपंचायतीकडून ही रक्कम जिल्हापरिषद कडे वर्ग केली जाते. या नंतर ती कंपनीला जाते. संगणक परिचालक पदवीधर सुशिक्षित असून देखील आज त्यांना वेळेत मानधन मिळाले नसल्याने कामाचे दाम नाही.कोरोनाची कामे असल्याने दुसरीकडे काम करता येत नाही अशी अस्वस्था झाली आहे. 
लॉक डाऊन मुळे ग्रामपंचायत मधील संगणकीय काम विविध दाखले, उतारे कोरोना विषयक काम हे सर्व ठप्प झाले असून याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे . 

संप दडपण्याचा प्रयत्न 
एक महिना झाला अद्याप जिल्हा प्रशासनाने याबाबत बैठक किंवा चर्चा करणेसाठी साधे निमंत्रण दिलेले नाही. यावरून जिल्हा प्रशासन गंभीर नाही याउलट संगणक परिचालक याना नोटीस काढून त्यांच्यावर दबाव टाकत आहे. सदर संप दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे.10 वर्षात कधीच मानधन वेळेवर मिळाले नाही. संगणक परिचालक कितीही काम करण्यास तयार आहे पण वेळेत मानधन नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

 

जो पर्यंत थकीत मानधन होणार नाही. तो पर्यंत कोरोना व्यतिरिक्त इतर काम बंद बेमुदत आंदोलन चालू राहील. हे आंदोलन आजून तीव्र करण्यात येईल. वेळ वेळ प्रसंगी जिल्हा परिषद व पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करू 

किरण पाचोरे  (जिल्हाअध्यक्ष संगणक परिचालक संघटना) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time of starvation on 520 computer operators in the district.