टेम्पोचा टायर फुटून भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

पंढरपूर येथून दहाव्याच्या कार्यक्रम उरकून बार्शीकडे परतत असताना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उपळाई बुद्रूक येथील जाधव वस्तीजवळ टायर फुटून हा अपघात झाला.

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) - माढा-पंढरपूर रस्त्यावर उपळाई बुद्रूक येथील जाधव वस्तीजवळ पंढरपूरहून येणाऱ्या टेम्पोचा (गाडी क्रमांक एम एच २५ बी ६०१७) टायर फुटून पलटी झालेल्या भीषण अपघातात २१ जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यापैकी ५ जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील रहिवासी आहेत.

पंढरपूर येथून दहाव्याच्या कार्यक्रम उरकून बार्शीकडे परतत असताना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उपळाई बुद्रूक येथील जाधव वस्तीजवळ टायर फुटून हा अपघात झाला. टेम्पोत एकुण ३३ जण होते. जखमीमध्ये ९ पुरूष व १२ महिलांचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना माढा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अाहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The tire of a tempo broke out and there was a fatal accident