सोलापूर ग्रामीणमध्ये आज 49 पॉझिटिव्ह ! 'या' गावात आढळले नवे रुग्ण 

तात्या लांडगे
Monday, 13 July 2020

ठळक बाबी... 

  • सोलापूर ग्रामीणमध्ये आतापर्यंत सहा हजार 502 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत जिल्ह्यात सापडले 899 कोरोना पॉझिटिव्ह; मृतांची संख्या 38 
  • जिल्ह्यातील 368 रुग्णांनी केली कोरोनावर मात; 493 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
  • रुग्णांच्या संपर्कातील 68 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित; आज दोघांचा मृत्यू 
  • कौठाळी आणि पंढरपुरातील अनिल नगरातील व्यक्‍तींचा सोमवारी झाला मृत्यू 

सोलापूर : शहराच्या तुलनेत आता ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. जिह्यातील 11 तालुक्‍यांमधील रुग्णांची संख्या आता 899 झाली असून मृतांची संख्या 39 वर पोहचली आहे. सोमवारी (ता. 13) जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्ये 49 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 

'या' गावांमध्ये सापडले नवे रुग्ण 
माळशिरसमध्ये एक, करमाळ्यातील सिध्दार्थ नगरात एक, सांगोल्यातील पुजारवाडीत एक, तर पंढरपुरातील झेंडे गल्ली, तुकाराम भवन येथे प्रत्येकी एक, रोहिदास चौकात तीन रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापुरातील बेलाटी व कोंडीत प्रत्येकी पाच, नान्नज येथे एक, मोहोळ तालुक्‍यातील चिंचोली काटीत दोन, येवतीत एक आणि दक्षिण सोलापुरातील कासेगाव, कंदलगाव, भंडारकवठे, आहेरवाडी येथे प्रत्येकी एका रुग्णांची तर वळसंगमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. अक्‍कलकोटमधील संजय नगर, खासबाग येथे प्रत्येकी एक, बार्शीतील व्हनकळस प्लॉट, भवानी पेठ, नाईकवाडी प्लॉट, सुभाष नगर, घोडके प्लॉट, कसबा पेठ, माळी गल्ली, रोडगा रस्ता, आगळगाव रोड, मुंगशी आर., काळेगाव, सौंदरे, बावी, सासुरे, घाणेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली आहे. वैरागमध्ये दोन, मांगाडे चाळ दोन असे एकूण 49 रुग्ण सोमवारी सापडले आहेत. 

ठळक बाबी... 

  • सोलापूर ग्रामीणमध्ये आतापर्यंत सहा हजार 502 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत जिल्ह्यात सापडले 899 कोरोना पॉझिटिव्ह; मृतांची संख्या 38 
  • जिल्ह्यातील 368 रुग्णांनी केली कोरोनावर मात; 493 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
  • रुग्णांच्या संपर्कातील 68 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित; आज दोघांचा मृत्यू 
  • कौठाळी आणि पंढरपुरातील अनिल नगरातील व्यक्‍तींचा सोमवारी झाला मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today 49 positive in Solapur rural