अभियांत्रिकी करिअरविषयी आज मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

सातारा - ‘सकाळ विद्या’ व ‘पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पिसीईटी) व ‘नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळा’च्या (एनएमव्हीपीएम) वतीने बारावी सायन्सनंतर करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात उद्या (ता. २६) होणार आहे.  

सातारा - ‘सकाळ विद्या’ व ‘पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पिसीईटी) व ‘नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळा’च्या (एनएमव्हीपीएम) वतीने बारावी सायन्सनंतर करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात उद्या (ता. २६) होणार आहे.  

बारावी सायन्सनंतरचे करिअरचे पर्याय, करिअरची अचूक निवड, अभियांत्रिकी, तसेच आर्किटेक्‍चर प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन, विविध शाखांमधील पर्याय यांसारख्या विषयांवर करिअरतज्ज्ञ विवेक वेलणकर व प्रा. विजय नवले मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर अभियांत्रिकीनंतरच्या करिअर संधी, व्यवसाय मार्गदर्शन, शाखेची निवड, महाविद्यालय निवडीमधील तंत्र पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सेंट्रल ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज, कट ऑफ, स्कॉलरशिप, ऑनलाइन अर्ज कसे भरावेत, फ्रिज-फ्लोट- स्लाईड यांसारख्या पर्यायांचा योग्य वापर कसा करावा, अर्ज भरताना कोणत्या चुका होतात व त्या कशा टाळाव्यात, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या प्लेसमेंट, रोजगार व करिअर संधी या विषयीच्या सर्व शंकांचे निरसन या चर्चासत्रातून होणार आहे. उपलब्ध संधी व विद्यार्थ्यांचा कल यांचा विचार करून करिअरचा योग्य निर्णय घेणे अतिशय योग्य ठरते. त्यामुळे जितके हे चर्चासत्र विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे, तितकेच पालकांसाठी त्यांच्या पाल्याच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. करिअर व परीक्षाविषयक सर्व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील. दहावीच्या विद्यार्थ्यांनाही हे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. 

कोठे-काय?
 कधी -शनिवार, २६ मे २०१८ 
 केंव्हा -सायंकाळी ५.३० वा.
 कोठे- यशवंतराव चव्हाण सभागृह, सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक, जिल्हा परिषद ऑफिससमोर, सदरबाजार, सातारा
 वक्‍ते - प्रा. विवेक वेलणकर, करिअरतज्ज्ञ, प्रा. शीतलकुमार रवंदळे, अधिष्ठाता सेंट्रल ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट, प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ व समुपदेशक
 अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क :  ८३८००९२२११/ ९५४५९५४७३३
 विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य.

Web Title: Today guidance about engineering careers sakal vidya