करमाळ्यातील पहिला "अंक' संपला! दुसऱ्या अंकाकडे लक्ष

Today NCP leader Rashmi Bagal enters in Shivsena
Today NCP leader Rashmi Bagal enters in Shivsena

सोलापूर : जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सध्या नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या प्रातिंक सदस्या रश्‍मी बागल यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बुधवारी (ता. 21) शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय रंगमंचावरील पहिला "अंक' संपला आहे. उमेदवारी मिळणार अशी आशा असल्यानेच आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे बागल सांगत आहेत. त्यामुळे सध्याचे शिवसेनेचे अमदार राजकीय रंगमंचावरील दुसऱ्या अंकात काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

2014 च्या निवडणूकीत बागल यांनी राष्ट्रवादीच्या "घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांचा शिवसेनेच्या "धनुष्यबाणा'वर निवडणूक लढवून आमदार पाटील यांचा पराभव केला होता. बागल व पाटील हे दोघेही राजकीयक्षेत्रात एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. बागलच्या प्रवेशाने 2019 च्या निवडणूकीत शिवसेनेची कोणाला उमेदवारी मिळणार यांची उत्सुकता लागली आहे. शिवसेनेची उमेदवारी मिळो अगर न मिळो निवडणूक लढवायचीच हे पाटील यांचे निश्‍चित आहे. "आमदार फक्त आबाच' असं सोशल मिडीयावर फिरतही आहे. पण बागल यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली तर पाटील कसे निवडणूक लढणार हे पाहावे लागणार आहे. पाटील यांची भूमिका हा त्याच्या पुढचा अंक असेल. तर लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर विधानसभा लढवायचीच असा आग्रह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे शिंदे यांनी स्वत: जाहीर केले नसले तरी तेही निवडणूकीत उतरतील असे अलिखीत सत्य आहे. राष्ट्रवादीकडून सध्याच्या स्थितीत त्यांना उमेदवारीही मिळू शकते. मात्र, त्यांचीही भूमिका काय असेल हे पाहवे लागणार. 

लोकसभा निवडणूकीवेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभुराजे यांनी भाजप प्रवेश केला होता. राज्यात या निवडणूकत शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आणि एकत्र लढले व बागल तर काय होणार याकडे लक्ष लागले आहे. पाटील यांना उमेदवारी मिळाली तर जगताप गट त्यांचे काम करिल यात विशेष काही नाही. मात्र बागल यांना उमेदवारी मिळाली तर जगताप त्यांचे काम करणार का हा प्रश्‍न आहे. तर दुसऱ्या बाजुला त्यांचेही काही कार्यकर्ते निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत आहेत. करमाळा तालुक्‍यात राजकिय रंगमंचावर सध्या अशा अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातील बागल यांचा शिवसेनेतील प्रवेश हा पहिला अंक आहे. आणि तो प्रवेशाने सध्या तरी संपला आहे. पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com