व्हिडीओ : गणरायाच्या नगरीत चौथी संकष्टी भक्ताविनाच ; 'सकाळ' कडून भक्तांसाठी 'श्री' चे दर्शन...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

सांगलीचे आराध्य दैवत गणपती असून प्रत्येक संकष्टीला गणपती मंदिरात भक्तांचा पूर पहायला मिळतो.

सांगली - सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या नगरीत 'लॉकडाउन' मध्ये आजची चौथी संकष्टी भक्ताविनाच साजरी करण्यात आली. गणपती मंदिर बंद असले तरी अनेक भक्तांनी दूरून दर्शन घेतले. तसेच बंद दरवाजाबाहेरूनच अनेकांनी गणपतीची आरती म्हटली. 'कोरोना' चे संकट टळू दे अशी प्रार्थना भक्तांनी मनोमन केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा प्रसार रोखला जावा तसेच गर्दी टाळली जावी यासाठी
मंदिरे, चर्च, प्रार्थनास्थळे आदी 'लॉक' करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेली साडे तीन महिने मंदिरांचा दरवाजा बंदच आहे. केवळ मंदिराचे पुजारी यांच्याकडूनच दैनंदिन पूजाअर्चा पार पाडली जाते. सांगली ही गणरायाची नगरी
म्हणून ओळखली जाते.

आराध्य दैवत गणपती असून प्रत्येक संकष्टीला गणपती मंदिरात भक्तांचा पूर पहायला मिळतो. गणपती पंचायतनचे मंदिर तसेच हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीचे दर्शन घेण्याची परंपरा इथल्या गणेशभक्तांनी जपली आहे. 'लॉकडाउन' मुळे गणपती मंदिर 24 मार्चपासून बंदच आहे. साडे तीन महिन्याच्या काळात आजची चौथी संकष्टीही भक्ताविनाच साजरी करण्यात आली. तरी देखील उत्साही भक्तमंडळींनी आज मुख्य दरवाजाबाहेरूनच गणपतीचे दर्शन घेतले. तसेच सकाळी अनेक भक्तांनी रस्त्यावर उभे राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आरतीला हजेरी लावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today's fourth Sankashti was celebrated without devotees in Sangli Lockdown