लोकशाही टिकविण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची आज खरी गरज - प्रा.दिगंबर दुर्गाडे

welhe.
welhe.

वाल्हे - महात्मा फुलेंनी समतेच्या तत्वाचा स्वीकार केला. स्त्री-पुरूष समानता, शिक्षण, जातिभेद निर्मूलनासाठी जनजागृती केली. फुले हे पुण्याचे कमिशनर असताना बंद नळातुन घरोघरी पाणी देण्याची योजना राबविली. फुले हे उकृष्ट व्यापारी, ठेकेदार व कंपनीचे व्यवस्थापक होते. स्वत: कष्ट करुन त्यांनी पैसे कमविले. त्यांनी शेती व उद्योगाचे शिक्षण देण्याची त्यांचीच कल्पना होती. संतांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. लोकशाही टिकविण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर व समाजसुधारकांच्या विचारांची 
आज खरी गरज असल्याचे, मत पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.

वाल्हे (ता.पुरंदर) येथे महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले विकास प्रतिष्ठान व आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कऱण्यात आला. त्यावेळी प्रा.डॉ.दुर्गाडे बोलत होते. 

याप्रसंगी शालिनी पवार, सचिन लंबाते, गोरखनाथ माने, विराज काकडे, शिवाजी पवार, दत्तात्रय पवार, दादासो पवार, महादेव चव्हाण, सतिश सुर्यवंशी, दिपाली भोसले, अंजली कुमठेकर, हनुमंत पवार, गोरख 
कदम, प्रविण कुमठेकर, पदमा माळवदकर, दादा मदने आदि उपस्थित होते.

यावेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी अभिषेक दुर्गाडे तसेच पुरंदर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्या अध्यक्षपदी संदेश पवार यांची निवड झाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी लेझीमच्या विविध प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

दरम्यान यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना भाजप तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. महात्मा फुले प्रतिष्ठानचे सागर भुजबळ, दादा राऊत, अनिल भुजबळ, तुषार भुजबळ, मनोज भुजबळ, गणेश भुजबळ, राहुल भुजबळ, उमेश भुजबळ आदिंनी कार्यक्रमाचे संयोजन केले. 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुर्यकांत भुजबळ य़ांनी प्रास्ताविक केले. दिपक कुमठेकर यांनी सुत्रसंचालन तर शंकर भुजबळ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com