#KolhapurFloods तासवडे, किणी टाेलनाका सर्व वाहनांसाठी `फ्री`

तानाजी पवार
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

टोलनाक्यांवरील सर्व वाहने मोफत सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर नाक्यावरील बॅरेकटस खूले करण्यात आले.
 

वहागाव : पूर स्थितीमुळे कोल्हापूर, सागंली जिल्ह्यात व कराड तालुक्यातील काही गावांत अजूनही महामार्गावर पुराचे पाणी असल्यामुळे सलग चार दिवसांपासून महामार्गावर अडकलेल्या हजारो वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या आपत्तीमुळे अनेक वाहनधारकांकडील संपूर्ण पैसे खर्च झाल्याने वाहनधारकांकडून महामार्गावरील टोल माफ करण्यात यावे अशी मागणी आज (शुक्रवार) सकाळपासून होत होती. याबाबत दुपारी अडीच वाजता शासनाने राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोलनाक्यांवरील सर्व वाहने मोफत सोडण्याचा निर्णय जाहीर केला. 
तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी ही माहिती दिली. शर्मा म्हणाले तासवडे व किणी टोलनाक्यावरील सर्व कामगार यंत्रणा हटवली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toll `Free` for all vehicles at nh4