आवक घटूनही टोमॅटोचा चिखलच 

संतोष सिरसट
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सोलापूर - मागील चार-पाच महिन्यांच्या तुलनेत बाजारात टोमॅटोची आवक आलेली नाही. आवक कमी असल्यास भाव वाढतात. मात्र, टोमॅटोची आवक कमी झाली असतानाही दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सोलापूर - मागील चार-पाच महिन्यांच्या तुलनेत बाजारात टोमॅटोची आवक आलेली नाही. आवक कमी असल्यास भाव वाढतात. मात्र, टोमॅटोची आवक कमी झाली असतानाही दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सोलापूर बाजार समितीमध्ये जुलै महिन्यापासून टोमॅटोला दरच नाहीत. जून महिन्यात झालेल्या थोड्याफार पावसाच्या जिवावर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. मात्र, सध्या डिसेंबर महिना चालू झाला तरी त्याला दरच नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारपेठेमध्ये मागणी व पुरवठ्याच्या गणितावर दराचे भवितव्य ठरलेले असते. मात्र, सध्या टोमॅटोच्या आवकेमध्ये जवळपास निम्यापेक्षा जास्तीने घट झाली आहे. आवकेत घट झाल्यानंतर दर वाढण्याची शक्‍यता असते; पण बाजारात टोमॅटोचे दर वाढत नसल्याचे चित्र मागील पाच महिन्यांपासून दिसून येत आहे.

सोलापूर बाजार समितीमध्ये जुलै महिन्यात सरासरी 25 हजार क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. ऑगस्ट महिन्यात ती 32 हजारांवर, सप्टेंबरमध्ये 30 हजारांवर आली होती. त्यानंतर ऑक्‍टोबर महिन्यात ती 19, तर नोव्हेंबर महिन्यात 11 हजार क्विंटलवर आली आहे. ऑक्‍टोबर महिन्यापासून टोमॅटोच्या आवकेत घट होत चालली आहे; पण घटीच्या तुलनेत दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या वेळी आवक वाढली जाते, त्या वेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इंदापूर, नगर, बारामती या भागातून टोमॅटो येतो; पण आता आवक कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातीलच टोमॅटो बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये दिल्ली येथील व्यापारी टोमॅटोची खरेदी करण्यासाठी येतात; पण तेही सध्या येत नसल्याने दरच मिळत नसल्याची स्थिती आहे.

Web Title: Tomatoes are no rate in market