पर्यटनासाठी पर्यटकांची कोल्हापूरला पसंती ! (व्हिडिओ)

अर्चना बनगे
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

दिवाळीच्या सुट्टीत यावर्षी राज्यातील अनेक पर्यटकांनी कोल्हापूरला अधिक पसंती दिली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या अंबाबाई मंदिराच्या दर्शनाबरोबरच अनेक ऐतिहासिक क्षेत्राचे दर्शन या भागात घडत असल्याने पर्यटक इकडे आकृष्ट झाले आहेत.

कोल्हापूर : दिवाळीच्या सुट्टीत यावर्षी राज्यातील अनेक पर्यटकांनी कोल्हापूरला अधिक पसंती दिली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या अंबाबाई मंदिराच्या दर्शनाबरोबरच अनेक ऐतिहासिक क्षेत्राचे दर्शन या भागात घडत असल्याने पर्यटक इकडे आकृष्ट झाले आहेत.

दिवाळी सुट्टी संपली की सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे पर्यटनासाठी बाहेर पडतात. पर्यटन हा प्रत्येकाचा आनंदाचा छंद असतो. त्यातच दिवाळीत शाळाांना सुट्टी असली कीअनेक कुटुंबे या सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेर पडतात. पुणे, मुंबई, सोलापूर, नांदेड नाशिक येथील पर्यटकांचे यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याला प्रथम प्राधान्य दिले आहे.

कोल्हापूर हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांची पवित्र भूमी म्हणून गणले गेले आहे. ऐतिहासिक तसेच धार्मिक भूमी म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशभरात लौकिक आहे. याचबरोबर येथील खाद्यसंस्कृतीही वेगळी आहे पर्यटनाला आलेले अनेक जण याचा आवर्जून स्वाद घेतात.
 

यंदा पर्यटकांनी अंबाबाई दर्शनना बरोबरच रंकाळा ज्योतिबा, पन्हाळा, न्यू पॅलेस, कनेरी मठ याला पसंती दर्शवली आहे. धार्मिक, ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्याबरोबरच कणेरी मठावर ती वसलेले गावं पाहून मेट्रो शहरातून येणाऱ्या पर्यटकांनी याला पसंती दिली आहे शहरी भागात राहणार्‍या मुलांना खेड्यांचा गंध नसतो. चुल, नऊवारी साडी परिधान केलेली आजी, चुलीवरचे जेवण करणाऱ्या महिला, शिंपी, गावठी खेळच आदी गोष्टी पाहून गावात गेल्याचा आनंद होतो. अशी भावना येणाऱ्या पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

केवळ गावाचं पाहिल्याची अनुभूती नाहीतर न्यू पॅलेस ला गेल्यावर ऐतिहासिक काळात गेल्याचा आनंद मिळाला असे अनेकांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये पर्यटन चांगले आहे शिवाय येथील वातावरण, आपुलकीची वागणूक यामुळे अनेक पर्यटक कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांच्या प्रेमात पडले असून या वर्षी पहिल्यांदाच पर्यटनासाठी आलो आहोत मात्र, इथून पुढे देखील कोल्हापूर पहिली पसंती असेल असे अनेक पर्यटकांनी सांगितले.

कोल्हापूरविषयी ऐकून माहीत होतं, आज कोल्हापूर फिरल्यावर जाणवले की जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं का म्हणतात ते इथे आल्यानंतर समजले आणि पर्यटनाला आल्याचं सार्थक झालं.- श्रीधर सावंत,पर्यटक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourists likes tourism Point in Kolhapur