ट्रॅक्‍टर दरीत कोसळून दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

तारळे - भागातील कोंजवडे- बेंदवाडी घाटात ट्रॅक्‍टर दरीत कोसळल्याने दोघे जण ठार झाले. घाटातून सुमारे 200 फूट खोल दरीत ट्रॅक्‍टर कोसळला. विलास कराडे (वय 25) व इराप्पा खरात (वय 26, दोघेही रा. चिकुंडी- करेवाडी, ता. जत, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. भुडकेवाडीच्या हद्दीत मध्यरात्री बाराच्या सुमारास दुर्घटना घडली. भुडकेवाडी, माळवाडी व कडवे गावच्या पन्नासहून अधिक युवकांनी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत मदतकार्य राबवल्याने मृतदेह पहाटे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. 

पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी - जत तालुक्‍यातील कराडे व खरात हे दोघेही त्यांचा ट्रॅक्‍टर घेऊन सवारवाडी येथे शेणखत भरण्यासाठी निघाले होते. बेंदवाडी घाटात आले त्या वेळी चालकाने ट्रॅक्‍टर भरधाव चालवला. त्यात त्याचा तोल गेल्याने ट्रॅक्‍टर खोल दरीत सुमारे 200 फूट खाली कोसळला. त्यात दोघेही ठार झाले. दरीत काही तरी पडल्याच्या आवाजाने डोगंराच्या खालच्या गावातील भुडकेवाडी, माळवाडी आणि कडवे गावामधील तरुणांनी धाव घेतली. त्यांनी मदतकार्य चालू केले; परंतु दरी अवघड असल्यामुळे व हलक्‍या पावसामुळे मदतकार्यात अडथळे आले. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास दोघांचे मृतदेह दरीतून वर काढण्यात सुरवात झाली. तारळे पोलिस क्षेत्राचे कर्मचारीही रात्रभर मदत कार्यात आघाडीवर होते. तब्बल चार तासानंतर अखेर पहाटे चार वाजता मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. दोन्ही मृतदेह कऱ्हाड येथे उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. 

Web Title: Tractor tractor collapsed in the valley