ढेबेवाडी-पाटण रस्त्यावर कोसळली दरड; वाहतूक विस्कळीत

राजेश पाटील 
बुधवार, 31 जुलै 2019

- ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटात आज सकाळी साडेआठ वाजता दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 
- अरुंद रस्ता, धोकादायक वळणे, सुटलेल्या दरडी, सुरक्षा कठडे व सूचना फलकांचा अभाव यामुळे हा घाटमार्ग पूर्वीपासूनच धोकादायक आहे.

 

ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटात आज सकाळी साडेआठ वाजता दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अरुंद रस्ता, धोकादायक वळणे, सुटलेल्या दरडी, सुरक्षा कठडे व सूचना फलकांचा अभाव यामुळे हा घाटमार्ग पूर्वीपासूनच धोकादायक आहे. आज दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचून वाहने घसरू लागल्याने मोठ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. 

दुचाकीचालक त्यातूनच कसरत करत येजा करत होते.दिवशी,मरळी, नवारस्ता,पाटणसह डोंगर कपारीत वसलेल्या वाड्या वस्त्यांना ढेबेवाडी खोऱ्यांशी जोडणारा हा एकमेव मार्ग आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic disruption caused to landslide in Dhebewadi-Patan road