आव्हानात्मक कोंडी नियंत्रणाचे दिव्य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

कऱ्हाड - शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेचा कारभार पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहणार आहे. ठाण्यातील वाढता व्याप लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे नियंत्रण स्वत- ठेवण्याचा निर्णय ढवळे यांनी घेतला आहे. शहरातील वाहतुकीत बदल करून कोंडी संपली पाहिजे. त्यावर ठोस निर्णय घेण्याचे आव्हान वाहतूक शाखेसह पोलिस उपअधीक्षकांनाही पेलावे लागणार आहेत. वाहतूक शाखेचा कारभारी बदलल्याने त्यांच्या कार्यपद्धतही बदल होण्याची शक्‍यता आहे. 

कऱ्हाड शहरात वाहतूक नियंत्रणासाठी शाखा आहे. त्याचा कारभार शहर पोलिस ठाण्यांतर्गत चालतो. त्या शाखेत 22 कर्मचारी आहेत. सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप खाटमोडे वाहतूक विभागाचे प्रमुख आहेत. वाहतूक शाखेसाठी असलेली पोलिसांची उपलब्धता व शहरातील वाहतुकीची स्थिती लक्षात घेता अवघड परिस्थिती दिसत आहे. प्रत्यक्षात 22 कर्मचारी असले, तरी बंदोबस्त, साप्ताहिक सुटी, रजा अशा विविध कारणांनी प्रत्यक्षात कामावर फक्त 17 ते 18 कर्मचारी हजर असतात. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या स्वरूपाचे काम करून घेण्याचे कसब वाहतूक शाखाप्रमुखांना पार पाडावी लागते. अशा स्थितीत पोलिसांचे मनोबलही खचताना दिसते. 

शहरात वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सातत्याने वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे त्या प्रत्यक्षात उपअधीक्षकांच्या नियंत्रणात शाखा असावी, अशी कल्पना येथे राबविण्यात आली. त्यासाठी पोलिस उपअधीक्षकांना पुढाकार घेतला आहे, असेच दिसते. पोलिस उपअीधक्षकांनी वाहतूक शाखा त्यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असला, तरी त्यांच्या पुढे आव्हान आहे. ती त्यांना पेलावी लागणार आहेत. पोलिस उपअधीक्षकांच्या नियंत्रणाखाली सुरू होणारा वाहतूक शाखेचा कारभार ती आव्हान कशी पेलणार तेही येणारा काळच ठरवेल. 

या गोष्टींवर करावे लागेल लक्ष केंद्रीत 
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमण काढणे, शहरात पार्किंग व्यवस्था करणे, शहरात येणारी अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, वाहतूक कोंडी फोडणे, कोल्हापूर नाक्‍यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे अशा अनेक गोष्टींवर त्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

Web Title: traffic issue in Karhad city