रंकाळा स्टॅंड चौकात रोजच 'ट्रॅफिक जाम'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर -  रंकाळा बस स्टॅंड चौक म्हणजे ट्रॅफिक जाम चौक असल्याचा अनुभव अनेक वाहनधारक रोज घेत आहेत. दुचाकी, त्यानंतर रिक्षा, त्यानंतर वडापची वाहने आणि त्यानंतर एस.टी.बस थांबा, अशा स्थितीत दुचाकी आणि चारचाकी चालकांनी पुढे जायचे कोठून हाच प्रश्‍न आहे. यातून रस्ता मिळाला तरच पादचाऱ्याला वाट मिळते. येथे पार्किंगसाठी पट्टे मारावेत, पादचाऱ्यांसाठी फुटपाथ करून वडाप व रिक्षांचे थांबे मुख्य रस्त्यापासून दूर करावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून, नागरिकांतून होत आहे.

कोकणातून येणारी अनेक महत्त्वाच्या मार्गांची वाहतूक या चौकातूनच पुढे जाते. फुलेवाडीसारख्या उपनगरातील वाहतूक शहरात येण्यासाठी हा मुख्य मार्ग मानला जातो. याच चौकात रंकाळा बस स्थानकात बसेस येतात; मात्र त्या स्थानकाच्या आवारात जाऊन थांबा न घेताच रस्त्याकडेलाच थांबतात. ट्रॅफिक जामचे हे मुख्य कारण आहे. येथे वडापच्या गाड्या मुख्य रस्त्यावर थांबतात. त्यामुळे इतर वाहनांना पुढे रस्ताच मिळत नाही. एस.टी. बसेस आणि वडपाच्या जीवघेण्या स्पर्धेचा फटका वाहनधारकांना बसत आहे. येथे वाहतुकीला शिस्तच नसल्याचे दिसून येते. पार्किंगचा तर बोजवाराच उडाला आहे. अवजड वाहनांसंदर्भात ही ठोस कारवाई होत नसल्याची स्थिती आहे. रिक्षा थांब्यालासुद्धा शिस्त लागली पाहिजे, अनेक वेळा रिक्षांच्या रांगेमुळेसुद्धा वाहतूक कोंडी होती. सर्वांनीच शिस्त ठेवायची ठरविली, तर नक्कीच ट्रॅफिक जामची परस्थिती बदलू शकते.

हे करण्याची गरज

  • अवजड वाहनांबाबत ठोस कारवाई
  • पाचच रिक्षांना थांब्यावर स्थान
  • वडापच्या गाड्या मुख्या रस्त्यापासून पाचशे मीटर लांब
  • पादचाऱ्यांसाठी फुटपाथ
  • सक्तीने एस.टी. बसगाड्या स्थानकातच
  • चौकात कोणताही थांबा असू नये
  • सक्तीने कारवाई होणे अपेक्षित

रंकाळा बस स्टॅंडची स्थिती
रोज किमान पाचशे बसेस येतात, जातात
संभाजीनगर डेपोतील रोजच्या बसेसच्या 218 फेऱ्या
राधानगरी, कोकण, गगनबावडा डेपोच्या रोज 195 -210 बसेसच्या फेऱ्या
कागल-रंकाळा डेपोच्या रोज 100 फेऱ्या

कोकण-वेंगुर्ला, देवगड-अक्कलकोट अशा बाहेरील बसेस रस्त्यावरच थांबतात. प्रवासी उतरल्यानंतर पुढे मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातात. यामुळेही वाहतूक कोंडी होते. या बसेस स्टॅंडमध्ये थांबल्या पाहिजेत.

Web Title: Traffic Jam in Rankala Stand chowk