साडेसातशे जणांना कारवाईचा दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

दिवसात दीड लाखावर दंड वसूल

सांगली - विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर सांगली वाहतूक शाखेने एका दिवसात तब्बल ७७० केसेस करून एक  लाख ५९ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांनी एकाच दिवसात कारवाईचा उच्चांक गाठला आहे.

दिवसात दीड लाखावर दंड वसूल

सांगली - विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर सांगली वाहतूक शाखेने एका दिवसात तब्बल ७७० केसेस करून एक  लाख ५९ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांनी एकाच दिवसात कारवाईचा उच्चांक गाठला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर  कारवाई करण्यासाठी परीक्षेत्रात काल सकाळी आणि सायंकाळी विशेष मोहीम राबवली गेली. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून कारवाईचा धडाका लावला. स्वत: पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे रस्त्यावर उतरले होते. तसेच अनेक ठिकाणी स्वत: भेट देऊन नाकाबंदी सुरू आहे की नाही? याची पाहणी केली. सांगली वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अतुल  निकम, उपनिरीक्षक बाळासाहेब माळी आणि पथकाने सोमवारी सकाळ आणि दुपारच्या सत्रात ७७० वाहन चालकांवर कारवाई केली. वाहन चालवण्याचा परवाना नसणे, मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबरप्लेट आदी नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अडवून दंडाची पावती फाडली गेली.  दिवसभरात वाहतूक पोलिसांनी ७७० जणांवर दंडात्मक कारवाई करताना एक लाख ५९ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. या कारवाई व्यतिरिक्त भरदिवसा दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या सहाजणांवर कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला पाठवला जाणार आहे. एका दिवसात तब्बल ७७० केसेस करण्याची कामगिरी म्हणजे एक नवा उच्चांकच म्हणावा लागेल. वाहतूक नियंत्रण आणि नियमांचे पालन करावे यासाठी विशेष मोहीम राबवली गेल्यामुळे वाहनधारक दक्ष बनले  आहेत. वाहन चालवण्याचा परवाना, कागदपत्रे सोबत बाळगून अनेकजण प्रवास करू लागलेत.

Web Title: traffic police fine recovery