वाहतूक पोलिसांचा 280 जणांना दंड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

सांगली - मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार नियम मोडणारांवर सुधारित दरानुसार दंडात्मक कारवाईचे आदेश दिले गेलेत. सांगली वाहतूक नियंत्रण शाखेने कालपासून याची अंमलबजावणी सुरू केली. दोन दिवसांत 280 जणांवर कारवाई करून सुमारे 50 हजार तडजोड शुल्क वसूल केले. 

मोटार वाहन कायदा 1988, 1989 नुसार वाहतूक नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. आरटीओ, वाहतूक नियंत्रणकडून कारवाई केली जाते. डिसेंबर 2016 मध्ये परिपत्रक काढून सुधारित तडजोड शुल्क निश्‍चित केले गेले आहे. यापूर्वी कमीत-कमी दंड शंभर रुपये होता. आता तो दोनशे करण्यात आला आहे. दोनशेपासून एक हजारपर्यंत दंड आहे. 

आरटीओकडून महिन्यापासून अंमलबजावणी केली जात होती. वाहतूक पोलिसांनीदेखील कालपासून अंमलबजावणी सुरू केली. तत्पूर्वी दोन आठवड्यांपासून वाहनधारकांना सूचना दिल्या होत्या. सुधारित तडजोड शुल्काचा फलकही कार्यालयासमोर लावला आहे. 

सहायक पोलिस निरीक्षक अतुल निकम यांनी वाहतूक नियंत्रण शाखेचा कार्यभार घेतल्यापासून तीन आठवड्यांत कारवाईचा धडाका लावला. चार दिवस विशेष मोहीम राबवून 1287 जणांवर कारवाई केली. जानेवारीत तर कारवाईचा उच्चांक गाठला. 5215 केसेस केल्या. 1 जानेवारीपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सुधारित दंडानुसार कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी 137 केसेस करून 24 हजार 900 रुपये दंड वसूल केला. दुसऱ्या दिवशीही 140 हून अधिकजणांवर कारवाई झाली. दोन दिवसांत 280 जणांवर कारवाई करून 50 हजार शुल्क वसूल केले. 

"ट्रिपल सीट' कारवाई 

सांगली परिसरात "ट्रिपल सीट' दुचाकी अनेकजण चालवत असल्याच्या तक्रारी आहेत. कारवाई केली जात आहे. "ट्रिपल सीट' चालवताना कोणी सापडल्यास कठोर कारवाई केली जाईल. वाहनचालकांनी नियमाचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. 

-अतुल निकम,  सहायक पोलिस निरीक्षक

Web Title: Traffic police fined 280 persons