सांगली - कोल्हापूर रस्त्यावर वाहतूक सुरु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सांगली -  सांगली कोल्हापूर रस्ता आज दुपारी एकच्या सुमारास सुरु झाला. तब्बल आठ दिवसांनी हा रस्ता सुरु झाला आहे. सांगलीहून कोल्हापूरला जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सांगली -  सांगली कोल्हापूर रस्ता आज दुपारी एकच्या सुमारास सुरु झाला. तब्बल आठ दिवसांनी हा रस्ता सुरु झाला आहे. सांगलीहून कोल्हापूरला जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दुपारी एक वाजता अंकली पुलावर वाहनांना पूलावरून जाण्यासाठी तब्बल 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागत होता. कोल्हापूरहून सांगलीला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र कमी आहे.

गेल्या आठवड्यात बुधवारपासून सांगली - कोल्हापूर रस्ता महापूरामुळे पूर्णबंद झाला होता. सांगलीत आयर्विन पुलावर आज दुपारची पाणीपातळी 45 फुटापर्यंत आली होती.

दरम्यान, सांगली ते नांद्रे, कर्नाळ रस्ताही सुरु झाला आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic starts on Sangli Kolhapur Road