पुणे-कोल्हापूर महामार्गावर 'या' भागात वाहतूक बंद

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

- कोल्हापूर येथील शिरोली गावाजवळ महामार्गावर पंचगंगा नदीचे पाणी आल्याने महामार्ग वाहतूक बंद केला आहे.
- पुण्याकडून गेलेली वाहने किणी वाठार टोल नाका येथे अडविला आहे.
- कागलहुन कोल्हापूरकडे येणारी वाहतूक कगनोली येथे अडविली आहे. 
-  सातारा ते कराड दरम्यान महामार्गावर पुराचे पाणी आल्याने विविध ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे

पुणे : पुणे-कोल्हापूर महामार्गावर तसेच कराड परिसरात देखील पुराचे पाणी आल्याने सुरक्षेच्या कारणावरून विविध ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुण्याकडून गेलेली वाहने किणी वाठार टोल नाका येथे अडविला आहे. तर, कागलहुन कोल्हापूरकडे येणारी वाहतूक कोगनोळी येथे अडविली आहे.

​राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कोल्हापूर येथील प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनीही सकाळची बोलताना सांगितले की, "कोल्हापूर येथील शिरोली गावाजवळ महामार्गावर पंचगंगा नदीचे पाणी आल्याने महामार्ग वाहतूक बंद केला आहे. पुण्याकडून गेलेली वाहने किणी वाठार टोल नाका येथे अडविला आहे. तर, कागलहुन कोल्हापूरकडे येणारी वाहतूक  कोगनोळी येथे अडविली आहे. तसेच सातारा ते कराड दरम्यान महामार्गावर पुराचे पाणी आल्याने विविध ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. "

महामार्गावर पाणी येणार असल्यामुळे महामार्ग वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाला सोमवारी कळविले आहे.

महामार्गावरील पाणी कमी झाल्याशिवाय ही वाहतूक पूर्ववत करण्यात येणार नाही तसेच. वाहतूक सुरळीतपणे सुरु ठेवण्याकरिता आवश्यक त्यासर्व वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी महामार्ग पोलिस स्थानिक पोलिस व कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्यावतीने नियोजन करण्यात आलेली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic stop at Kini wathar Toll and kagnoli on Pune Kolhapur highway