भावाच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू

सुनील गर्जे 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नेवासे : नगर येथे शिक्षण घेत असलेल्या धाकड्या भावाच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून घरी असलेल्या मोठ्या भावाचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नेवासे तालुक्यातील चिंचोली या गावी घडली. याबाबतची माहिती गावावर शोककळा पसरली.

नेवासे : नगर येथे शिक्षण घेत असलेल्या धाकड्या भावाच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून घरी असलेल्या मोठ्या भावाचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नेवासे तालुक्यातील चिंचोली या गावी घडली. याबाबतची माहिती गावावर शोककळा पसरली.

सचिन चावरे (वय 21) व शुभम चावरे (वय 19) असे मृत्यू झाल्याची नावे आहेत. नजीक चिंचोली येथील शेतकरी पोपट चावरे यांचा नगर येथे एमबीएचे शिक्षण घेत असलेला लहान मुलगा शुभमचा मंगळवार (ता. 4) रोजी सकाळी कॉलेजच्या पायऱ्या चढत असताना आचानाक मागे पडला. त्याला तातडीने नगर सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले.

शुभमच्या मृत्युची बातमी त्याचा मोठा भाऊ सचिनला समजताच हा धक्का सहन न झाल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला दुपारी भेंडे व त्यांनतर नेवासे फाटा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सचिनचेही उपचारापूर्वीच मृत्यू झाला. नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुभमचे शवविच्छेदन तर नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात सचिनचे शवविच्छेदन केल्यानंतर दोघा भावांचे मृतदेह नजीक चिंचोली येथे आणण्यात आले. सायंकाळी पाच वाजता शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नजीक चिंचोलीसह परिसरातील गावावर शोककळा पसरली.

Web Title: In a tragic event, two brothers died on the same day at Nagar District