सोलापूर विभागातील रेल्वे गाड्या 29 ऑगस्टपर्यंत रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

इंटरसिटी एक्‍स्प्रेस 29 ऑगस्टपर्यंत, तर हुतात्मा व उद्यान एक्‍स्प्रेस 23 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर व दौण्ड सेक्‍शनमधील वडशिंगे ते भाळवणी या 35 किलोमीटर अंतरावरील दुहेरीकरण व सिग्नल जोडणीची कामे (नॉन-इंटरलॉकिंग) सुरु आहेत. त्यामुळे 27 ऑगस्टपर्यंत सोलापूर विभागावरुन धावणाऱ्या 62 रेल्वे गाड्या रद्द, तर 12 गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 10 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये इंटरसिटी एक्‍स्प्रेस 29 ऑगस्टपर्यंत, तर हुतात्मा व उद्यान एक्‍स्प्रेस 23 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 

नागरकोई- मुंबई, मुंबई- नागरकोई, त्रिवेंद्रम- मुंबई, मुंबई- त्रिवेंद्रम, तिरुपती- मुंबई, मुंबई- तिरुपती, मुंबई- भुवनेश्‍वर, मुंबई- हैदराबाद, हैदराबाद- मुंबई हुसेनसागर एक्‍स्प्रेस आणि भुवनेश्‍वर- मुंबई कोणार्क एक्‍स्प्रेसचे मार्ग 24 ऑगस्टपर्यंत बदलले आहेत. तर मुंबई- गदग, गदग- मुंबई, हैदराबाद- पुणे, पुणे- हैदराबाद, बेंगलोर- मुंबई, मुंबई- बेंगलोर उद्यान एक्‍स्प्रेस, मिरज- कुर्डूवाडी, कुर्डूवाडी- मिरज, एलटीटी- विशाखापट्टणम, विशाखापट्टणम- एलटीटी एक्‍स्प्रेस आणि निजामाबाद- पंढरपूर, पंढरपूर- निजामाबाद एक्‍स्प्रेस 24 ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

रद्द झालेल्या प्रमुख गाड्या (कंसात कालावधी) 
साईनगर- पंढरपूर, पंढरपूर- साईनगर एक्‍स्प्रेस (15,18,20,22 व 25 ऑगस्ट), सोलापूर- कोल्हापूर, कोल्हापूर- सोलापूर (18 ते 22 ऑगस्ट), पुणे- सोलापूर, सोलापूर- पुणे हुतात्मा एक्‍स्प्रेस (20 ते 23 ऑगस्ट), सोलापूर- पुणे, पुणे- सोलापूर इंटरसिटी (इंद्रायणी) एक्‍स्प्रेस (17 ते 29 ऑगस्ट), हैदराबाद- मुंबई, मुंबई- हैदराबाद एक्‍स्प्रेस (16 ते 23 ऑगस्ट), सोलापूर- मिरज, मिरज- सोलापूर एक्‍स्प्रेस (18 ते 23 ऑगस्ट), भुवनेश्‍वर- पुणे व पुणे- भुवनेश्‍वर एक्‍स्प्रेस (20 व 22 ऑगस्ट), पुणे- सोलापूर व सोलापूर- पुणे डेमू पॅसेंजर (16 ते 29 ऑगस्ट), मुंबई- पंढरपूर व पंढरपूर- मुंबई फास्ट पॅसेंजर (15 ते 18 व 22 ते 25 ऑगस्ट), मुंबई- विजयपूर, विजयपूर- मुंबई फास्ट पॅसेंजर (18 ते 22 व 25, 26 ऑगस्ट) या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trains in Solapur region canceled till August 29