मंगळवेढ्याच्या मुख्याधिकार्‍यांची तडकाफडकी बदली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मंगळवेढा - येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. निलेश देशमुख यांची प्रशासकीय कारणांमुळे बदली झाली असून, त्यांच्या जागेवर पलूस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची करण्यात आली. या बदलीचा आदेश शासनाकडून अव्वर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी पारीत करण्यात आला.

उदया बुधवारी त्यांना मंगळवेढा नगरपरिषदेत रुजू व्हावे लागणार आहे. मुख्याधिकारी निलेश देशमुख यांची नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे बदली झाली असून, बुधवारी तिथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. गेल्या वर्षभरापासून नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी गटातच वर्चस्वासाठी सातत्याने खडाजंगी होत असे. यात मुख्याधिकारी देशमुख हे अनेकदा गैरहजर असत. शिवाय ते दीर्घ रजेवर असल्याने सांगोल्याच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असायचा शहरात अनेक विकास कामे सुरू आहेत. याशिवाय काही कामे प्रस्तावित आहेत. शहर स्वच्छ अभियानांतर्गत जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी स्वच्छता अभियानात गेल्या वर्षी चांगले काम केले असल्याने यंदाही स्वच्छता अभियानात राज्य स्तरावर नावलौकिक मिळवण्यासाठी वेगाने कामास लागली होती. तर नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्यात धुसफूस होती.

दरम्यान, नवनियुक्त मुख्याधिकारी पल्लवी पाटील या पलूस येथे त्यांच्या कार्यशैलीमुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांच्याही बदलीसाठी पलूसमध्ये अनेक नागरिकांनी सह्यांची मोहीम राबवली होती. तरीही मंगळवेढयात सत्ताधारी गटासह विरोधी गटाला विश्‍वासात घेत कामाचा वेग कायम ठेवावा लागणार आहे.

Web Title: transfer of mangalwedha Chiefs