पारदर्शी कारभाराने "सॅलरी' लोकाभिमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

सांगली - सहकारातील अनेक सोसायट्या डबघाईला आल्या. मात्र सॅलरी सोसायटीच्या संचालकांच्या पारदर्शी कारभारामुळे प्रतिमा लोकाभिमुख झाल्याचे गौरवोद्‌गार वसंतदादा पाटील रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी काढले.

दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या विश्रामबाग शाखेच्या उदघाटन प्रसंगी डॉ. सांगळे बोलत होते. जिल्हा कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी अध्यक्षस्थांनी होते. डॉ. सांगळे म्हणाले, ""पारदर्शी कारभारामुळे जनमानसात संस्थेची प्रतिम चांगली आहे. भांगभांडवल, ठेवीमुळे संस्था भक्कम पायावर उभा आहे.‘‘
सॅलरीचे अध्यक्ष लालासाहेब मोरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ""भागभांडवल 43 कोटी असून संस्थेची गणना मोजक्‍या अग्रगण्य म्हणून होत आहे.‘‘

इकबाल मुलाणी, जी. डी. कुलकर्णी, नाभिराज सांगले-पाटील, रामराव मोडे, सुभाष तोडकर, शरद पाटील, झाकीरहुसेन मुलाणी, अनिल पाटील, अरुण बावधनकर, अभिमन्यू मासाळ, सुहास सूर्यवंशी, जाकीरहुसेन चौगुले, अश्‍विनी कोळेकर, विद्यामती रायनाडे, सुभाष थोरात, वसंत खाबे, उपाध्यक्ष पी. एन. काळे उपस्थित होते.

Web Title: Transparent management "Salary"