ट्रॅव्हल्स आणि क्लुझर जीपच्या भीषण अपघातात एक ठार, पस्तीस जखमी

Travels and  Jeep accident, one killed, 35 injured
Travels and Jeep accident, one killed, 35 injured

टेंभुर्णी : टेंभुर्णी - पंढरपूर रस्त्यावरील अकोले बुद्रुक गावानजिक खासगी लक्झरी बस व क्लुझर जीप यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एक ठार तर सुमारे पस्तीस जण जखमी झाले. जखमींपैकी किमान पंधरा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटील हॉस्पीटल, रामकृष्ण हॉस्पीटल व मंगल हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त खासगी लक्झरी बसमधील सर्व जखमी नवीमुंबई येथील कोपरखैरणे व नेरूळ याभागातील असून आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते. तर क्लुझर जीपमधील सर्व जखमी मंगळवेढा येथील रहिवासी असून ते औरंगाबादला निघाले होते. 

या अपघातग्रस्त खासगी लक्झरी बसमधील शंकर मारूती पवार (वय- 50 रा नेरूळ नवीमुंबई) हे गंभीर जखमी होऊन उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताविषयी समजलेली अधिक माहिती, हभप ब्रम्हमूर्ती शांताराम महाराज जाधव (बोरी बुद्रुक, जुन्नर पुणे) यांच्या ज्ञानदिप ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी नवीमुंबई येथील नेरूळ, कोपरखैरणे या भागातील भाविकांना  खासगी लक्झरीबस ने आणले जाते. यावर्षी कोपरखैरणे नेरूळ येथून तीन खासगी लक्झरी बसने भाविक श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जात होते. त्यापैकी खासगी लक्झरी बस(एम एच 43/एच 2952) ही टेंभुर्णी पंढरपूर रस्त्यावरील अकोले बुद्रुक गावानजिक वळणावर मंगळवेढा येथून कोर्ट कामानिमित्त औरंगाबाद येथे निघालेली क्लुझर जीप (एम एच 13/सी एस 9997) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. 

या अपघातातील दोन्ही वाहनांची धडक एवढी जबरदस्त होती की क्लुझर जीपच्या समोरील बाजूचा चेंदामेंदा झाला तर खाजगी लक्झरीबस अपघातानंतर रस्त्याच्या नाल्यावरून खाली पलटी झाली. त्यामुळे दोन्ही वाहनांमधील लोक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद खोबरे हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमींना रूगणवाहिकेतून टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटील हॉस्पीटल, रामकृष्ण हॉस्पीटल व मंगल हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या जखमींपैकी शंकर मारूती पवार हे उपचार सुरू असताना मृत पावले तर क्लुझर जीप मधील जखमींना दुपारी पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com