दोन महिन्याच्या उपचारानंतर दिसली कोल्ह्याच्या पिलाची चपळाई 

Treatment was done on the fox's crib in the wounded condition at solapur
Treatment was done on the fox's crib in the wounded condition at solapur

सोलापूर : जखमी अवस्थेत मिळालेल्या कोल्ह्याच्या पिलावर उपचार करुन पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात आले. दोन महिन्याच्या उपचारानंतर त्याची चपळाई दिसून आली. 

19 मार्च 2019 ला एनटीपीसी परिसरात एका वाटसरुने रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत एक कुत्र्याचे पिल्लू पडल्याचे सांगितले. घटनास्थळी जावून पाहिले असता ते कोल्ह्याचे पिल्लू होते. तत्काळ वनविभागाचे वनरक्षक बी. एस. भोई. यांना घटनेची माहिती दिली.

पुढील उपचारासाठी सोलापूर येथील ऍनीमल राहतला बोलविण्यात आले. कोल्ह्याचे पाय फॅक्‍चर असल्याचे आढळले. कोल्ह्याच्या दोन्ही पायास प्लास्टर करण्यात आले. दोन्ही पाय बरे होण्यासाठी बराच कालावधी लागणार होता. कोल्ह्याला वन विभागाच्या परवानगीने बंकलगी येथील प्राणीमित्र संस्थेकडे सोपविण्यात आले. ऍनीमल राहतचे डॉ. राकेश चित्तोड, डॉ.आकाश जाधव, भीमाशंकर विजापूरे यांनी कोल्ह्याच्या पायावर वेळोवेळी उपचार केले. 

कोल्ह्याच्या पिल्लाला माणसाचा लळा लागू नये म्हणून गाईच्या गोठ्यात त्याचा स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्याच्या पायाचे प्लास्टर काढल्यानंतर लागलीच आपली चपळाई दाखवून दिली. गोठ्यातील उंदीर पकडून फस्त केले. कोल्हा स्वत: शिकार करण्यास सक्षम दिसताच शनिवारी वनरक्षक बी. एस. भोई, वनमजुर आदीत्य शिंदे, प्रभुलिंग नरबळे, सचीन साळुंखे यांच्यासमवेत वन्यजीव प्रेमी मल्लिकार्जुन धुळखेडे, महेश रेवणे, सुनील यांनी कोल्ह्यास पुन्हा त्याच परिसरात नेवून सोडले. सुरवातीला ते पिल्लू पायात फेऱ्या मारत होते, काही वेळानंतर त्याने ऊसात धुम ठोकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com