शेटफळ ता. मोहोळ येथे वृक्ष लागवडीचा उपक्रम

Tree plantation activitie at shetfal taluka Mohol
Tree plantation activitie at shetfal taluka Mohol

मोहोळ - आजकाल दुर चित्रवाणी व मोबाईलच्या वापरामुळे मानवाचे निसर्गाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पर्जन्यमानही कमी झाले आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भविष्यातील चांगल्या पिढीसाठी टीव्ही मुक्त गाव ही संकल्पना राबविली पाहिजे, तर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. विजयराज डोंगरे मित्रमंडळाचा हा वृक्ष लागवडीचा उपक्रम जिल्ह्याला आदर्श असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.

शेटफळ ता. मोहोळ येथील देवमाळावर डोंगरे मित्र मंडळाच्या वतीने तीन हजार 333 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम डॉ. भारूड यांच्या हस्ते आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. लोकशक्ती भीमा परिवाराचे नेते मनोहर डोंगरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी अर्थ व बांधकाम सभापती विजय राज डोंगरे, मुख्य लेखाधिकारी महेश अवताडे, अमोल डोंगरे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, शेटफळच्या सरपंच रंजना लवटे, उपसरपंच दतात्रय वागज, डॉ अमित व्यवहारे, सभापती समता गावडे, उपसभापती साधना देशमुख, अविनाश गोडसे, आघाडीचे गट नेते अशोक सरवदे, गौतम क्षीरसागर, गट शिक्षणाधिकारी मारूती फडके, सौदागर खडके, पांडुरंग बचुटे, शहाजी मोटे, लक्ष्मण घागरे, बाळासाहेब भांगे, पं. स. सदस्या सुनीता भोसले, शारदा पाटील आदीसह पापरी खंडाळी, येवती, कोन्हेरी देवडी, गिडडेवाडी आदी भागातील नागरीक मोठया संखेने उपस्थित होते.

सभापती विजयराज डोंगरे म्हणाले, कितीही तंत्रज्ञान प्रगत आले तरी निसर्गाला पर्याय नाही, झाडे लावण्यापेक्षा ती जगवीली पाहिजेत. गटविकास अधिकारी येळे यांनी प्रत्येक खड्ड्याचे जिवो टॅगिंग झाल्याचे सांगितले. यावेळी डॉ. भारूड यांच्या हस्ते चिंच, नारळ, आंबा, चिक्कु, लिंबोणी आदी फळांची झाडे लावण्यात आली. पाच एकर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com