प्रेतांना आधार देणाऱ्या बांबूंनी दिला झाडांना आधार

किरण चव्हाण
शनिवार, 23 जून 2018

माढयातील इन्सपायर फाऊंडेशनने माढयात लावलेल्या झाडांना स्मशानभूमीतील बांबूंनी आधार दिला आहे.  प्रेतांना आधार देणा-या बांबूंनी आता झाडाला आधार दिला आहे.

माढा(सोलापूर ):  माढयातील इन्सपायर फाऊंडेशनने माढयात लावलेल्या झाडांना स्मशानभूमीतील बांबूंनी आधार दिला आहे.  प्रेतांना आधार देणा-या बांबूंनी आता झाडाला आधार दिला आहे.

माढयात इन्सपायर फाऊंडेशनने सोलापूर रस्ता, वैराग रस्ता,  कुर्डूवाडी रस्ता, शेटफळ रस्ता व शहरात एक हजार झाडे लावली आहेत. सध्या पावसाळयात वारा  व पावसामुळे झाडे कलून पडू लागली आहेत. झाडांना आधारासाठी लावलेले छोटे बांबू खराब झाले असून बांबू छोटे असल्याने आधारही देवू शकत नाहीत.

इन्सपायर फाऊंडेशनच्या युवकांनी यावर नामी शक्कल लढवली. माढयातील स्मशानभूमीत पडलेले बांबू एकत्र करून झाडांना आधार देण्यासाठी लावण्यास सुरूवात केली आहे. स्मशानभूमीतील वस्तु वापरणे अनेक जण अनेक कारणांमुळे टाळतात. मात्र या  टाकावू वस्तुंचा वापरही इन्स्पायर फाऊंडेशनच्या युवकांनी मोठ्या खूबीने केला आहे.

Web Title: for Trees support bamboo used in Graveyard

टॅग्स