हरिश्चंद्र गड : गिर्याराेहक अरुण सावंत यांचा दुर्देवी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

अरुण सावंत हे ट्रेकींगच्या क्षेत्रातील माेठ नाव मानलं जात. गेल्या तीस ते पस्तीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत अरुण सावंतांनी सह्याद्रीमधील अनेक ठिकाण आणि अनेक वाटा उजेडात आणल्या आहेत. त्यांच्या मृत्यूने राज्यभरातील ट्रेकर्सला धक्का बसला आहे.
 

नगर  : काेकण कडयावरुन बेपत्ता झालेले गिर्याराेहक अरुण सावंत यांचा  आज (रविवारी) मृतदेह सापडला आहे. हरिशचंद्र गडावर रॅपलिंग करताना शऩिवारी (ता. 18) सावंत हे बेपत्ता झाले हाेते. स्थानिकांच्या मदतीने सावंत यांचा शाेध घेण्यात आला. कड्याच्या दरीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान सावंत यांच्यासमवेत असलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आल आहे. 

अरुण सावंत आणि अन्य गिर्याराेहकांची टीम असे एकूण 30 जण हरिश्चंद्र गडावर रॅपलींगसाठी आले हाेते. हरिश्चंद्र गडाचा काेकण कडा ते माकड नाळ या हरिशचंद्र गडावर गडाचाच एक भाग असलेल्या कड्यापर्यंत त्यांची टीम आधी वरुन खाली आणि त्यानंतर आडवं रॅपलींग करणार हाेते. रॅपलींगचा पहिला टप्पा जवळपास पुर्ण हाेत आला हाेता.

काेकण कड्यावरुन रॅपलींग करताना अरुण सावंत हे ग्रुप लीडर हाेते. त्यांच्यासमवेत 29 जण पहिला टप्पा उतरुन आले हाेते. सर्वांत शेवटी अरुण सावंत दाेरीचा सहाय्याने रॅपलींग करत असताना शनिवारी (ता.18) सायंकाळी पाच वाजता नाहीसे झाले. तेव्हापासून अरुण सावंत यांच्याशी काेणताही संपर्क झालेला नव्हता. स्थानिकांच्या मदतीने सावंत यांचा शाेध घेण्यात आला. 

काेकण कड्याची एकूण उंची अठारशे फूट  आहे. जिथून अरुण सावंत नाहीसे झाले हाेते ती उंची जवळपास एक हजार फुटांची आहे. हरिश्चंद्र गडाच्या पाय्थाशी असलेल्या बेलपाडा गावातून अरुण सावंत यांचा शाेध सुरु करण्यात आला हाेता. त्यांचा मृतदेह आज (रविवार) आज सापडला.
 
अरुण सावंत हे ट्रेकींगच्या क्षेत्रातील माेठ नाव मानलं जात. गेल्या तीस ते पस्तीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत अरुण सावंतांनी सह्याद्रीमधील अनेक ठिकाण आणि अनेक वाटा उजेडात आणल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trekker Arun Sawant Found Dead In Kokan Kada

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: