मंगळवेढ्यात अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली

हुकूम मुलाणी
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधनाबद्दल शहरातील आठवडा बाजारातील भाजी मंडईत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

मंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधनाबद्दल शहरातील आठवडा बाजारातील भाजी मंडईत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, नगराध्यक्षा अरूणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, जिल्हा बॅक संचालक बबनराव आवताडे, भाजपाउपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपाध्यक्ष राजेन्द्र सुरवसे, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा.येताळा भगत, धनश्री परिवाराचे शिवाजी काळुंगे, दत्तात्रय जमदाडे, औदुंबर वाडदेकर, नगरसेवक प्रवीण खवतोडे, राजश्री टाकणे, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, मारुती वाकडे, संतोष मोगले, मल्लिकार्जून शिरोळे, अॅड रमेश जोशी, सुरेश जोशी, उपसरपंच सुहास पवार, शुभांगी सुर्यवंशी, दिपक माने, बिरू घोगरे आदीसह विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके म्हणाले की, एक अजातशत्रू, मृदु कवी, विरोधकांचे ही आवडते राजकारणी, संयमी, कधीही पायरी न घसरता टिकाटिप्पणी करण्यात निष्णांत,परमाणू सज्ज राष्ट्र बनवणारे, अतुलनीय व्यक्तिमत्व स्वर्गीय झाले.त्यांच्या जाणवल्याने कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली. यावेळी शिवाजी काळुंगे,नगराध्यक्षा अरूणा माळी,प्रा. येताळा भगत, दत्तात्रय जमदाडे, सुरेश जोशी, अॅड रमेश जोशी यांनी श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले.

Web Title: tribute to atal bihari vajpayee in mangalwedha