कुख्यात गुंड दत्ता जाधववर 38 लाखांची खंडणीचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

कवठे - 'मोक्का' लावलेला साताऱ्यातील कुख्यात गुंड दत्ता जाधववर भुईंज पोलिसात 38 लाख रुपयांचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला. 

कवठे - 'मोक्का' लावलेला साताऱ्यातील कुख्यात गुंड दत्ता जाधववर भुईंज पोलिसात 38 लाख रुपयांचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे भंगार विक्रीचे टेंडर निघाले होते. ते टेंडर फिर्यादी इक्बाल सय्यदताबील हुसेन (वय 48, सध्या रा. भुईंज) हे टेंडर भरण्यासाठी आले होते. ता. 12 डिसेंबर 2017 रोजी पासून 3 मे 2018 पर्यंत दत्ता जाधव त्याचा एक पैलवान मित्र, शुक्रराज पांडुरंग घाडगे, शामराव तिवारी, कुमार खत्री व अन्य चार जण (सर्व रा. सातारा) यांनी किसनवीर कारखान्याचे भंगार विक्री मालाचे टेंडर भरू नका अशी दमबाजी करीत टेंडर आमच्या नावावर मिळवून देतो असे सांगून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी देत तसेच ट्रक पेटवून देण्याची धमकी दिली व जबरदस्तीने किसनवीर कारखान्यातून पुणे येथे घेऊन जाऊन जबरदस्तीने 22 लाख रुपये तसेच वेळोवेळी मागणी करून तब्बल 38 लाख रुपये वसूल केल्याचे फिर्यादी इक्बाल हुसेन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या खंडणीच्या गुन्ह्याची नोंद भुईज पोलिसात झालेली असून, अधिक तपास भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत.

Web Title: Tribute crime on gund datta jadhav

टॅग्स