दुधनी येथे स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

राजशेखर चौधरी
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अक्कलकोट - दुधनी ता. अक्कलकोट येथे सकाळी ०९ वाजता गांधी चौक यथील नगर परिषदे समोर भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न डॉ. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अटल प्रेमींनी शोकसभेचे आयोजित केले होते.प्रथम अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मेणबत्त्या लावून स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी सर्वांनी २ मिनिट मौन बाळगली. यावेळी भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी अमर रहे हे घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी दौलत हौदे, भीमाशंकर अंदेनी, शांतलिंग वागदरी, गुरुशांत वडेयार, मल्लिनाथ कामनळी, सुनील अमाणे, बसवराज मिरकल, श्रीशैल घुळनूर, संगमेश हौदे, सिद्धाराम चंडके, हणमंत वाडी, प्रकाश कोळी, गुरुशांत फुलारी, अप्पू माळगे, शिवराज साणक आदी उपस्थित होते. तसेच दुधनी शहर भाजप पक्षाकडून सुद्धा स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .यावेळी दुधनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, भाजप शहर अध्यक्ष अप्पू परमशेट्टी, नगरसेवक महेश पाटील, नगरसेवक अतुल मेळकुंदे, रामचंद्रप्पा बिराजदार, अरविंद भाईकट्टी, हणमंत कलशेट्टी, बसवराज हौदे, गुरुशांत कोळी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Tribute to late Atal Bihari Vajpayee at Dudhni