त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नेवासे फाटा (नगर) - विद्यार्थ्यांना सक्तीच्या बेसिक सैनिकी प्रशिक्षणाबरोबर सर्व देशी-विदेशी खेळांच्या उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या सर्व शैक्षणिक संकुलांमध्ये राज्यभरातील, तसेच बाहेरच्या राज्यांतील पालकांची पसंती मिळत आहे. मध्यमवर्गीय पालकांना परवडेल अशी माफक फी हे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या सर्व शैक्षणिक संकुलांचे वैशिष्ट्य आहे.

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान व शैक्षणिक संकुलाच्या नगर जिल्ह्यातील नेवासे फाटा, शेवगाव, ढोरजळगाव, तेलकुडगाव, घोगरगाव, श्रीरामपूर तसेच विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे अशा सात ठिकाणी वसतिगृहांसह सैनिकी पद्धतीच्या शाळांमध्ये केजी ते बारावी पर्यंतच्या सर्व वर्गांमध्ये 2018-19- या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश सुरू आहेत.

मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील वाणिज्य, होम सायन्स, विज्ञान, डी.एड., बी.एड., विधी इत्यादी विविध विद्या शाखांमध्ये प्रवेशाकरिताही वाढती पसंती मिळते आहे. खेळ व प्रशिक्षणातून स्वावलंबन, शिस्त, धाडस, प्रबळ आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, गुणवत्ता व मुलांच्या मनामध्ये संशोधन वृत्ती वाढविणाऱ्या त्रिमूर्तीच्या सर्व शाळा नामांकित आहेत.

रायफल शूटिंग, धनुर्विद्या, घोडेस्वारी, मल्लखांब, नेमबाजी, कुस्ती, योगासने, पॅरासेलिंग, बोटिंग, स्केटिंग तसेच देशी-विदेशी सर्व खेळांच्या उत्कृष्ट सुविधा या संकुलात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. येथील निवासी शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुला-मुलींसाठी संस्थेने 55 बसची व्यवस्था केली असल्याने परिसरातल्या पालकांना विशेष दिलासा मिळाला आहे.

अकरावी व बारावीसाठी "नीट' व "जेईई'च्या स्कॉलर बॅचेसही असल्याने वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीकडे ओढा असणाऱ्या मुला-मुलींनीही त्रिमूर्तीमध्ये शिक्षण घेण्याला प्राधान्य दिले आहे.

Web Title: trimurti education complex admission student