सांगलीत ट्रकने वाहने चिरडली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

सांगली : मध्यधुंद अवस्थेत ट्रक चालवणाऱ्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने गुरुवारी मध्यरात्री येथील मारुती चौक ते टिळक चौक रस्त्यावर अपघात झाला. ट्रकने रस्त्याकडेला उभ्या मारुती कार, जीप आणि दुचाकींना चिरडले. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी चालक संजय नागू राऊत (रा. डोंबाळवाडी, जि. सातारा) याला अटक केली आहे. 

संजय राऊत हा इचलकरंजीहून ट्रक घेऊन सांगलीकडे येत होता. तरुण भारत क्रीडांगणाच्या उत्तर दिशेच्या रस्त्याने मारुती रस्ता ओलांडून तो टिळक चौकाकडे निघाला होता. संजय दारु पिवून वाहन चालवत होता. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने मारुती कारला चिरडत झाडावर नेऊन आदळले. पुडे काळी-पिवळी प्रवासी वाहतुकीची मॅक्‍सीकॅब होती. तिला चिरडले. एका दुचाकीचा चेंदामेंदा केला. आवाज ऐकून लोक बाहेर आले. ट्रक पुढे जाऊन थांबल्यानंतर संजय राऊतला लोकांनी पकडून चोप दिला. तोवर सांगली शहर पोलिसांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी संजयला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

Web Title: truck crushes other vehicles rashly in sangali