कऱ्हाड - ट्रकचालकास मारहाण करून लुटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

कऱ्हाड : पुणे ते बंगळुर महामार्गावर येथील पाचवड फाट्यावर रत्नागिरीहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकचालकास मारहाण करून 45 हजारास लुटले. त्याबाबत कऱ्हाड शहर पोलिसात काल रात्री तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. यातील एकास बोरगाव पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले आहे. अन्य दोघे फरार आहेत. 

पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (ता. 3) मध्यरात्री अभिमन्यू ज्ञानदेव गोगावले (वय 71) मालट्रक मधून फिनोलेक्स कंपनीचा माल घेऊन रत्नागिरीहून पुणे येथे निघाले होते. यावेळी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा ट्रक पाचवड फाटा येथे आला. त्यावेळी अचानक पुढे प्रवासी रिक्षा येऊन थांबली. त्यामुळे गोगावले यांनी ट्रक थांबविला. रिक्षामधून दोेघे खाली उतरले.  त्यांनी ट्रकमध्ये चढून गोगावले यांना मारहाण केली. त्यांची व गाडीतील असी सुमारे 45 हजारांची रोकड काढून घेऊन ते रिक्षातून पळून गेले. त्याच्या ट्रक मागे काही अंतरावर गोगावले यांचा मुलगा दुसरा ट्रक घेऊन आला. गोगावले यांचा ट्रक पाहून त्याने ट्रक थांबविला. घडलेल्या प्रकाराची माहीत घेऊन काही अंतर पुढे गेलेल्या त्यांच्याच कंपनीच्या अन्य दोन ट्रकच्या चालकांना फोन करून घडला प्रकार सांगितला. रिक्षाची माहिती देऊन ती आडविण्याची सूचना केली. त्यानंतर त्यांनी बोरगाव पोलिसांच्या मदतीने ती रिक्षा पकडली. यावेळी रिक्षा चालक सतीश संगाप्पा दळवी (रा. दूधगंगा कॉलनी, सैदापूर, कऱ्हाड) याला अटक केली आहे. अन्य दोघे संशयित पसार झाले. त्यांच्या पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Web Title: truck driver beating by theft