ट्रकचालकांचे लाक्षणिक उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

कोल्हापूर - वाहतुकदारांच्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनात जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशने सहभाग घेतला . जिल्ह्यातील १० हजार ट्रक बंद असून आजपासून ट्रक मालक आणि चालकांनी उजळाईवाडी येथे लक्षणीक उपोषणाला प्रारंभ केला. समाजातील विविध व्यापारी, औद्योगिक आणि मजूर संघटनांनी असोसिएशनच्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिला.  पेट्रोल-डिझेल दरवाढ, टोल नाक्‍यावरील भ्रष्ट व्यवस्था, थर्ड पार्टी इन्शुरन्स मधील विमा हप्त्यातील वार्षिक वाढ यासर्वाला विरोध करण्यासाठी देशभरातील वाहतुकदारांनी चक्का जाम आंदोलनाला सुरु केले आहे. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून बंदची व्याप्ती दिवसागणीक वाढत आहे.

कोल्हापूर - वाहतुकदारांच्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनात जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशने सहभाग घेतला . जिल्ह्यातील १० हजार ट्रक बंद असून आजपासून ट्रक मालक आणि चालकांनी उजळाईवाडी येथे लक्षणीक उपोषणाला प्रारंभ केला. समाजातील विविध व्यापारी, औद्योगिक आणि मजूर संघटनांनी असोसिएशनच्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिला.  पेट्रोल-डिझेल दरवाढ, टोल नाक्‍यावरील भ्रष्ट व्यवस्था, थर्ड पार्टी इन्शुरन्स मधील विमा हप्त्यातील वार्षिक वाढ यासर्वाला विरोध करण्यासाठी देशभरातील वाहतुकदारांनी चक्का जाम आंदोलनाला सुरु केले आहे. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून बंदची व्याप्ती दिवसागणीक वाढत आहे. जिल्हा लॉरी ऑपरेटर्स संघटनेने आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच लाक्षणीक उपोषण करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडे मागितली. मात्र पोलिसांनी परवागी तर दिली नाहीच पण खासगी जागेत उभारलेला मंडपही उतरवला.

मागण्या व्यावहारिक आहेत. तरी देखील सरकार गांभिर्याने पाहण्यास तयार नाही. जिल्ह्यातील विविध संघटना चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही तर सामान्य माणसालाही याची झळ पोहचेल. 
- सुभाष जाधव, अध्यक्ष, लॉरी ऑपरेर्टस असोसिएशन

Web Title: Truck Driver Fasting