कोल्हापूरजवळ अचानक झालेल्या स्फोटात ट्रकचालक ठार

Blast in Kolhapur Dattatraya Patil dead
Blast in Kolhapur Dattatraya Patil dead

कोल्हापूर - उजळाईवाडी उड्डाणपूल येथील शाहू टोलनाक्‍याजवळ शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास ज्वलनशील वस्तूच्या स्फोटात ट्रक चालक दत्तात्रय गणपती पाटील (वय ५६, रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) ठार झाले. अचानक झालेल्या स्फोटाने एकच खळबळ उडाली. 

याबाबत समजलेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी - पाटील सायंकाळी स्वतःच्या ट्रकमधील माल उतरवण्यासाठी गोकुळ शिरगावला गेले होते. तेथे माल उतरून रात्री दहाच्या सुमारास ते परतत असतानाच उजळाईवाडी टोलनाक्‍याजवळ त्यांचा ट्रक बंद पडला. त्यानंतर पाटील यांनी याची माहिती मित्र आशिष आनंदराव चौगले (३६, रा. लिशा हॉटेलसमोर) यांना मोबाइलवरून दिली. त्यानंतर चौगले काही वेळातच शाहू टोलनाक्‍याजवळ आले. त्यानंतर ते पाटील यांच्याकडून ट्रक बंद पडल्याबाबतची माहिती घेत होते. त्याच वेळी जोरदार पाऊस आला. पाऊस आल्याने ते निवाऱ्यासाठी उड्डाणपुलाखाली गेले.

त्यादरम्यान त्यांना फोन आला म्हणून ते येथून आणखी बाजूला गेले. एवढ्यात पाटील उभे असलेल्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. यामध्ये पाटील गंभीर जखमी झाले. जोरदार स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चौगले यांनाही काय करावे, ते सुचत नव्हते. चौगुले यांनी तेथूनच रुग्णवाहिकेला फोन केला आणि याबाबतची माहिती दिली. रुग्णवाहिकेतून पाटील यांना तत्काळ सीपीआरमध्ये आणले; मात्र डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम होता. रात्री उशिरापर्यंत पोलिस या स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत होते. स्फोट कशामुळे झाला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नव्हती. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह गोकुळ शिरगावचे पोलिस उपनिरीक्षक सुशांत चव्हाण घटनास्थळी पोहोचले होते.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com