मालट्रक चोरणारी टोळी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

आपल्या पथकास सूचना देऊन या चोरीतील तरुणांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने जयसिंगपूर येथून
मालट्रक चोरी करणाऱ्या प्रणेश भोसले, निलेश साळुंखे, अनिकेत भोसले या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मालट्रक चोरल्याची कबुली दिली. 

सांगली : संजयनगर परिसरातील प्रमोद डेअरी येथून दहा चाकी मालट्रक चोरणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. या टोळीत तिघा तरुणांचा समावेश असून ते सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील आहेत. याप्रकरणी त्यांच्या एजंट मित्रास चौकशीसाठी ताब्यात
घेण्यात आले आहे. चौघांनाही संजय नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अटक केलेल्यांमध्ये प्रणेश राजू भोसले (वय 19, रा. जयसिंगपूर, ता.शिरोळ), निलेश साहेबराव साळुंखे (वय 19, रा. चिपरी, ता. शिरोळ), अनिकेत अशोक भोसले (वय 19, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांचा समावेश आहे. सचिन लक्ष्मण गवळी (वय 26, रा. नांदणी, ता. शिरोळ) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमोद डेअरी येथून दहा चाकी मालट्रकची चोरी झाली होती. हा ट्रक जयसिंगपूर येथील तरुणांनी चोरल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली.

त्यांनी आपल्या पथकास सूचना देऊन या चोरीतील तरुणांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने जयसिंगपूर येथून
मालट्रक चोरी करणाऱ्या प्रणेश भोसले, निलेश साळुंखे, अनिकेत भोसले या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मालट्रक चोरल्याची कबुली दिली. 

तसेच चोरलेला ट्रक नांदणी येथील त्यांचा एजंट मित्र सचिन गवळी याच्या मध्यस्थीने अंकली (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव)
येथे विकल्याचे सांगितले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने एजंट सचिन गवळी यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना पुढील तपासासाठी संजयनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, अमित परीट, सुधीर गोरे, शशिकांत जाधव, विकास भोसले तसेच सायबर शाखेकडील संदीप पाटील, सुनिल मदने यांनी केली.

Web Title: Truck Theft Arrested